बँकेच्या स्थूल एनपीएत (Gross Non Performing Assets NPA) यामध्ये मात्र १.३३% वरून १.४% वर वाढ झाल्याने असेट क्वालिटीत घसरण झाली आहे. निव्वळ एनपीए (Net NPA) मध्येही मागील वर्षाच्या तिमाहीतील ०.४३% तुलनेत वाढ होत ०.४३% वर पोहोचला. बँकेच्या कर्मचाऱ्यांवर केलेल्या खर्चात मागील वर्षीच्या तिमाहीतील २३९००.५३ कोटीवरून घसरत ६११५.९४ कोटीवर आले आहे. कंपनीच्या कामकाजातील खर्चात (Operating Expenses) मध्ये मागील वर्षी तिमाहीतील १७७८४६.९५ कोटींवरून घसरत ४५३९४.३१ कोटींवर खर्च गेला आहे.
बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) म्हणजेच कामकाजातून मिळणाऱ्या नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील १८८६ कोटींवरून वाढत नफा १९९२ कोटींवर पोहोचला आहे. करपूर्व कमाईत (EBI TDA) मध्ये मात्र मागील वर्षाच्या तिमाहीतील ६५१ कोटीवरून १३.२% घट होत ५६५ कोटींवर गेले आहे. कंपनीच्या निव्वळ नफा (Net Profit) मध्येही मागील वर्षाच्या तिमाहीतील ९८ कोटींच्या तुलनेत घसरण होत ४४.७ कोटींचा नफा मिळाला आहे.
माहितीनुसार, एकूण मालमत्तेच्या (Total Assets) ३.३५% वर कोर निव्वळ व्याज मार्जिन (Core Net Margin) नोंदवले गेले आहे.३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या मागील तिमाहीत ३.४६% होते.एचडीएफसी बँकेने त्यांच्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले की, ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न (मिळवलेले व्याज आणि खर्च केलेले व्याज यांच्यातील फरक) ५.४% वाढून ३१४३९ कोटी झाले आहे, जे ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत २९८३९ कोटी होते.' असे म्हटले.
बँकेने आपल्या भागभांडवलधारकांसाठी बोनस शेअर देखील जाहीर केला आहे. संचालक मंडळाने यासाठी मान्यता दिल्याने प्रत्येक फुल पेड अप (Fully Paid Up) समभागावर १ रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेला समभाग बँक आपल्या गुंतवणूकदा रांना देणार आहे. याशिवाय बँकेने आपल्या भागभांडवलधारकांसाठी विशेष लाभांश (Special Dividend) देणार आहे. यापूर्वीच बँकेने याबाबत स्पष्ट केले होते. संचालक मंडळाने यासाठी मान्यता दिल्यानंतर आता भागभांडवलधारकांना ५ रूपयांचा विशेष अंत रिम लाभांश मिळणार आहे. 'विशेष अंतरिम लाभांश मिळविण्यास पात्र असलेल्या सदस्यांची पात्रता निश्चित करण्याची रेकॉर्ड तारीख शुक्रवार, २५ जुलै २०२५ आहे. पात्र सदस्यांना विशेष अंतरिम लाभांश सोमवार, ११ ऑगस्ट २०२५ रोजी दिला जाईल' असे बँकेने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.