काँग्रेस, राजद सरकारने नेहमीच बिहारला लुटले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप


पाटणा : २०१४ नंतर तुम्ही मला केंद्रात सेवा करण्याची संधी दिली, आम्ही बदला घेण्याचे हे राजकारण संपवले. दोन दशकांपूर्वी बिहारचा हक्काचा पैसा कसा लुटला गेला हे आजच्या पिढीने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काँग्रेस आणि राजद सरकारने नेहमीच बिहारला लुटले आहे, हे लोक बिहारचा बदला घेत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.


निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी मोतिहारी येथे जनतेला संबोधित करताना मोदींनी पाटण्याला पुण्यासारखे आणि गयाला गुरुग्रामसारखे बनवले जाईल, असेही सांगितले. बिहारची भूमी ही आंदोलनाची भूमी आहे. एनडीए सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.



गरिबांसाठी ७ लाख घरे


गरिबांसाठी ४ कोटींहून अधिक घरे बांधली गेली आहेत, त्यापैकी सुमारे ७ लाख घरे एकट्या बिहारमध्ये गरिबांसाठी बांधली गेली आहेत. जगातील काही देशांच्या लोकसंख्येइतकीच बिहारमधील गरिबांना आम्ही काँक्रीटची घरे दिली आहेत. एकट्या मोतिहारी जिल्ह्यात आम्ही सुमारे ३ लाख गरीब कुटुंबांना घरे दिली आहेत. ही संख्या सतत वाढत आहे.



पंतप्रधानांनी दाखवला अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा


पंतप्रधान मोदींनी पूर्व चंपारणसाठी ७०० कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यांनी देशासाठी ४ अमृत भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यापैकी एक गाडी मोतिहारी ते दिल्ली दरम्यान धावेल. पंतप्रधान मोदी यांनी समस्तीपूर-बछवाडा रेल्वे विभागावरील स्वयंचलित सिग्नलिंग सुविधा राष्ट्राला समर्पित केली. याशिवाय, दरभंगा-थलवाडा आणि समस्तीपूर-रामभद्रपूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, जे ५८० कोटी रुपयांच्या दरभंगा -समस्तीपूर दुहेरीकरण प्रकल्पाचा एक भाग आहे. यामुळे गाड्यांचा विलंब कमी होईल आणि वेग वाढेल.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या