हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टीमुळे ११६ जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत १२३० कोटी रुपयांचे नुकसान


शिमला: हिमाचल प्रदेशात यंदा मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या महिनाभरात झालेल्या विविध घटनांमुळे ११६ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने दिली.


राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २० जून ते १८ जुलै या कालावधीत पावसाशी संबंधित आपत्ती आणि अपघातांमध्ये ११६ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. या एकूण मृतांपैकी ६८ जणांचा मृत्यू थेट पावसाशी संबंधित घटनांमध्ये झाला आहे. त्यामध्ये ३३ वेगवान पूर (Flash Floods), २२ ढगफुटी (Cloudburst), आणि १९ दरड कोसळणे (Landslides) यांचा समावेश आहे. फ्लॅश फ्लड्स आणि ढगफुटीमध्ये प्रत्येकी १४ जणांचा मृत्यू, बुडाल्यामुळे १२ जणांचे प्राण गेले, विजेचा धक्का बसून ५ जणांचा मृत्यू झाला, तर दरड कोसळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याशिवाय साप चावणे, तसेच इतर कारणांनी २२ मृत्यू झाले आहेत.


पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, घसरट चढ-उतार, दरड कोसळणे आणि कमी दृश्यता यामुळे राज्यात ४८ रस्ते अपघातांचे बळी गेले आहेत. सोलानमध्ये ८, कुल्लूमध्ये ७, चंबामध्ये ६ आणि शिमलामध्ये ४ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. हिमाचलमधील मंडी, कांगडा, कुल्लू आणि लाहौल-स्पीती हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. मंडी आणि कांगडा येथे प्रत्येकी १६ जणांचा मृत्यू, तर कुल्लूमध्ये ७ जणांचे प्राण गेले आहेत.


मुसळधार पाऊस, भूस्खलन, महापूराच्या आपत्तीमुळे राज्यातील सार्वजनिक पायाभूत सुविधा, घरे, शेती, पशुधन आणि दळणवळण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण आर्थिक नुकसान १२३० कोटी रुपये इतके असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ, होम गार्ड्स आणि स्थानिक प्रशासनामार्फत बचाव आणि पुनर्स्थापना कार्य सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना अत्यावश्यक नसल्यास डोंगराळ भागात प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे तसेच स्थानिक हवामान आणि आपत्ती विषयक सूचना व सल्ल्यांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे