Stock Market Marathi : शेअर बाजारातील सेन्सेक्स निफ्टी 'इतक्याने' घसरला! सकाळच्या सत्राचे 'विश्लेषण'

  65

मोहित सोमण: शेअर बाजारात आजही अस्थिरता कायम असू शकते. तरीही ढोबळमानाने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किरकोळ वाढ अथवा किरकोळ घसरण होण्याची शक्यता आहे. सकाळी शेअर बाजार उघडल्यावरच सेन्सेक्स (Sensex) १५४.५० अंका ने घसरला आहे तर निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांक २३.५० अंकाने घसरला. आज पहाटे गिफ्ट निफ्टीत वाढ झाली असली तरी सकाळी ९.१५ वाजेपर्यंत गिफ्ट निफ्टीत ०.१६% घसरण झाली आहे. परिणामी आज बाजारातील गुंतवणूकदारांचा मूड भापणे कठीण ठरू शकते. सेन्सेक्स बँक निर्देशांकात सुरुवातीच्या कलात ५३७.८० अंकांनी घसरण व बँक निफ्टीत २६४.३० अंकांनी घसरण झाल्याने बाजार गडगडत आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०५%,०.०८% अशी किरकोळ वाढ झाली असून निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅप मध्येही अनुक्रमे ०.०६%,०.०४% इतकी किरकोळ वाढ झाली.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) मध्ये आज संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तरीही एकूणच भलतीच चढाओढ मात्र दिसत नसल्याने खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्रीय समभागात टक्केवारी कमीजास्त होण्याची शक्यता प्रबळ नाही. सर्वाधिक वाढ मिडिया (०.६७%), मेटल (०.६१%), रिअल्टी (०.२६%), तेल व गॅस (०.३१%),ऑटो (०.३६%%) समभागात वाढ झाली. सर्वाधिक घसरण फायनाशिंयल सर्व्हिसेस (०.४९%), फायनांशियल सर्व्हिसेस २५/५० (०.४०%), खाजगी बँक (१.०२%), मिडस्मॉल हेल्थ केअर (०.२७%) समभागात घसरण झाली आहे. विशेषतः भारतीय अस्थिरता निर्देशांक (०.३१%) राहिल्याने अस्थिरतेची पातळी मर्यादित राहू शकते. काल युएस बाजारात चांगली वाढ झाली आहे. एस अँड पी ५०० बाजारात 'रेकॉर्डब्रेक' वाढ झाली आहे. युएस मधील प्रदर्शित झालेली नवी आकडेवारी बाजाराला बळ देऊन गेली. अमेरिकेतील किरकोळ विक्रीत (Retail Sales) मध्ये मोठी वाढ झाली. या आकड्यानंतर कमकुवत अर्थव्यवस्थेतही बाजाराला युएस गुंतवणूकदारांनी सकारात्मक कौल दिला. ज्यामध्ये आय टी,ओटीटी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.

युएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात केल्याच्या अटकळीमुळे शेअर बाजारात फायदा झाला. खासकरून गव्हर्नर क्रिस्टोफर वॉलर यांनी महिन्याच्या अखेरीस २५ बेसिस पॉइंट कपातीला पाठिंबा दिल्याने ही वाढ झाली असली तरी मात्र वॉलर अजूनही मध्यवर्ती बँकेत अल्पसंख्याकांपैकी एक आहेत जे तात्काळ दर कपातीची मागणी करत आहेत. इतरांनी तूर्तास वेट अँड वॉचचे धोरण अवलंबले आहे. दुसरीकडे जपानचे निर्यात आकडेवारी कमकुवत आल्यामुळे आशियाई बाजारात काल संमिश्र कौल कायम होता. युएस बाजारातील पुढील आठवड्यात तिमाही निकाल जाहीर होतील, त्या व ट्रम्प यांच्या नव्या टेरिफवरील वक्तव्यांचा बाजारात परिणाम कायम राहू शकतो. तरीदेखील जागतिक पातळीवर मंदी, खरेदीमध्ये रस नसणे आणि वित्तीय, आयटी आणि दिग्गज कंपन्यांमधील फंडामेंटलमधील कमजोरता यामुळे युएस गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला आहे. भारतीय बाजारातही तिमाही आकडेवारी जाहीर होत असल्याने क्षेत्रीय विशेष कंपनीच्या समभागात त्याचा परिणाम दिसू शकतो. रिलायन्स, जेएसडब्लू स्टील, जियो फा यनांशियल सर्व्हिसेस, एक्सिस बँक या समभागावर लक्ष केंद्रित करणे भारतीय गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे ठरू शकते. तसेच फार्मा, आयटी, बँक, तेल व गॅस, मेटल समभागातील हालचाल पाहणे संयुक्तित ठरेल.

आशियाई बाजारातही सगळेकाही आलबेल नाही. जपानमध्ये निर्यात आकडेवारीनंतर आता महागाईचे आकडे समोर आली आहे ज्यामध्ये मे महिन्यात ३.७% उच्चांक पातळीवर पोहोचलेली महागाई यंदा घसरण ३.३% वर आली असली तरी बँक ऑफ जपानच्या २% टार्गेटपेक्षा अधिक असल्याने बँक ऑफ जपानकडून व्याज दर कपात करण्याची शक्यता कमीच आहे. भारतीय बाजारातही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) कडून स्पष्ट संकेत मिळाले नाहीत मात्र रूपयांची सुरु झालेली घसरण, एफआयआय सातत्याने काढून घेत असलेली गुंतवणूक यामुळे निर्देशांकात घसरण होत असतानाच भारतीय कंपन्याची तिमाहीतील कामगिरी व क्षेत्रीय कामगिरी आधाराचेच आजही कामगिरी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान बँक, फायनान्स निर्देशांकातील पातळीही बाजारातील सपोर्ट लेवल ठरवू शकते. याखेरीज तेल, गॅस, सोने चांदीचे आंतरराष्ट्रीय दरही पुढील आठवड्यांसाठी दिशादर्शक ठरू शकतील.

सकाळच्या सुरुवातीच्या कलात सर्वाधिक वाढ सफायर फूडस (५.५९%), टाटा कम्युनिकेशन (४.२५%),सारेगामा इंडिया (३.४६%), आनंद राठी वेल्थ (३.२६%), विप्रो (३.८%),आर आर केबल (३.१६%), मदर्सन वायरिंग (२.०२%), एल अँड टी फायनान्स (१. ९९ %), एसईएमई सोलार होल्डिंग्स (१.८९%), सम्मान कॅपिटल (१.६७%),पॉवर ग्रीड (१.५८%), मन्नपुरम फायनान्स (१.३७%), गोदरेज अँग्रोवेट (१.२१%), इंडियन हॉटेल्स (१.१७%), एनटीपीसी ग्रीन (०.७६%), विशाल मेगामार्ट (०.७२%), इन्फोऐज (०.७१%), टीसीएस (०.४१%), महिंद्रा अँड महिंद्रा (१.१५%), ओएनजीसी (०.५७%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.३२%) समभागात झाली. सर्वाधिक घसरण मात्र क्लिन सायन्स (६.४४%), एक्सिस बँक (४.२९%), आलोक इंडस्ट्रीज (३.९९%), न्यूजेन सॉफ्टवेअर (३.७८%), डाबर इंडिया (१.५३%), भारती एअरटेल (१.३२%), कजारिया सिरॅमिक्स (०.९७%), कोलगेट पामोलिव (०.४४%), एमसीएक्स (०.१८%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.९५%), होंडाई मोटर्स (०.८२%), इटर्नल (०.८५%), सीजी पॉवर (०.७८%), कोटक महिंद्रा बँक (०.७५%), गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट (०.७२%), आयसीआयसीआय लाईफ इन्शुरन्स (०.३८%) समभागात झाली.

आजच्या सुरुवातीच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,' जुलैमध्ये आतापर्यंत भारत बहुतेक बाजारपेठांमध्ये कमी कामगिरी करत आहे, निफ्टीमध्ये १.६% ची घसरण झाली आहे. या घसरणीला एफआयआयची विक्री हा एक महत्त्वाचा वाटा आहे. या वर्षी आतापर्यंत एफआयआयच्या क्रियाकलापांमध्ये एक स्पष्ट नमुना आहे. पहिल्या तीन महिन्यांत ते विक्रेते होते. पुढील तीन महिन्यांत ते खरेदीदार ब नले. आणि सातव्या महिन्यात आतापर्यंतचे ट्रेंड आणखी विक्री दर्शवितात जोपर्यंत काही सकारात्मक बातम्या बाजारातील घसरणीला उलट करत नाहीत. रोख बाजारपेठेत विक्रीबरोबरच एफआयआय डेरिव्हेटिव्ह्ज बाजारातही शॉर्ट पोझिशन्स वाढवत आहेत, जे मंदीचा अंदाज दर्शवते. भारतातील वाढलेले मूल्यांकन, इतर बाजारपेठांमध्ये स्वस्त मूल्यांकन एफआयआयच्या क्रियाकलापांवर परिणाम करत राहतील. अलीकडच्या काळात भारतातील आर्थिक क्रियाकलापांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लक्झरी वापराची लवचिकता आणि मोठ्या प्रमाणात वापरातील कमकुवतपणा. पहिल्या तिमाहीच्या निकालांचे सुरुवातीचे संकेत - 'हॉटेल' उद्योगातील चांगले निकाल  या ट्रेंडची सातत्य दर्शवतात. सर्व क्षेत्रांमध्ये निश लक्झरी सेगमेंट चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.'

निफ्टीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले की,' घसरगुंडी २५१२०-२५०९० क्षेत्रापर्यंत पसरली होती, जी काल एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून नोंदवली गेली होती. या क्षेत्रातील विरामामुळे आ ज २५३३० ते २५४२० पर्यंत वाढण्याची शक्यता निर्माण होते. आता आपण दिशात्मक उतार-चढाव खेळण्यासाठी २४९२० च्या खाली थेट घसरण होण्याची वाट पाहू, दरम्यान, २५१५०-१८८-२६५ वर वरच्या बाजूस मध्यवर्ती आव्हाने दिसून येत आहेत.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर मत मांडताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे डेरिएटिव विश्लेषक हार्दिक मतालिया म्हणाले की,' भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज सपाट ते सकारात्मक पातळीवर उघडण्याची अपेक्षा आहे, असे गिफ्ट निफ्टीने दर्शविले आहे, जे निफ्टी ५० मध्ये सुमारे १७ अंकांची किरकोळ वाढ दर्शवते. मागील सत्रात सावध बंद झाल्यानंतर बाजारातील भावना अजूनही किंचित अनिर्णीत राहिल्या आहेत. सत्राच्या सुरुवातीच्या सहामाहीत निफ्टी निर्देशांक बाजूला होता परंतु दिव साच्या उत्तरार्धात विक्रीचा दबाव आला, अखेर तो २५१०० पातळीच्या वर थोडासा बंद झाला. दैनिक चार्टवर मंदीचा एक गुंतवणुकीचा नमुना तयार झाला, जो संभाव्य अल्पकालीन उलटा दर्शवितो. तात्काळ आधार (Immediate Support) २५००० वर ठेवला आ हे, २४९००-२४७०० दरम्यान मजबूत आधार क्षेत्र (Strong Support Zone)आहे. या पातळींपेक्षा कमी ब्रेकडाउनमुळे घसरणीची गती वाढू शकते. वरच्या बाजूस, २५२५० तात्काळ प्रतिकार म्हणून काम करते, तर तेजीचा ट्रेंड पुन्हा सुरू करण्यासाठी २५४०० - २५५०० श्रेणीच्या वर निर्णायक ब्रेकआउट आवश्यक आहे.

बँक निफ्टी निर्देशांक ३५८.८० अंकांनी (-०.६३%) खाली बंद झाला,दैनिक चार्टवर एक मजबूत मंदीची मेणबत्ती (Weak Candle) तयार होत आहे, जी विक्रीचा वाढता दबाव आणि अलिकडच्या वाढीच्या ट्रेंडमध्ये संभाव्य विराम दर्शवते. तात्काळ आधार ५६५०० वर आहे, त्यानंतर ५६३०० जवळ एक महत्त्वाचा स्तर आहे. या आधारांपेक्षा कमी झाल्यास वाढीव घसरण होऊ शकते. वरच्या बाजूला, ५७००० वर प्रतिकार दिसून येतो, ५७३००-५७५०० वर एक मोठा अडथळा असतो. या झोनच्या वर ब्रेकआउट होईपर्यंत, ट्रेंड सावध राहतो, कठोर जोखीम व्यवस्थापनासह विक्री-ऑन-राइज धोरणाला अनुकूल राहतो.संस्थात्मक बाजूने, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) १७ जुलै रोजी सलग दुसऱ्या सत्रात निव्वळ विक्रेते राहिले, त्यांनी ३,६९४ कोटी किमतीच्या इक्विटीज ऑफलोड केल्या. दरम्यान, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) सलग नवव्या सत्रात खरेदीचा जोर सुरू ठेवला, २,८२० कोटी किमतीच्या इक्विटीज खरेदी केल्या. वाढत्या अस्थिरतेचे आणि मिश्र संकेतांचे सध्याचे वातावरण पाहता, व्यापाऱ्यांना विशेषतः लीव्हरेज वा परताना सावध "विक्री-ऑन-राइज" दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला दिला जातो. बुकिंग जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी, रॅली दरम्यान अंशतः नफा मिळवणे आणि कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस लागू करणे शिफारसित आहे. निफ्टी २५३७८ पातळीच्या वर टिकून राहिल्यासच नवीन लॉन्ग पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. व्यापक बाजारातील वातावरण सावधपणे तेजीत असले तरी, प्रमुख तांत्रिक पातळी आणि विकसित होत असलेल्या जागतिक संकेतांचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे.'

यामुळे एकूणच बाजाराची परिस्थिती पाहता ती लवचिक असू शकते मात्र मोठा परतावा आज गुंतवणूकदारांना मिळू शकेल याची शक्यता कमीच दिसते.
Comments
Add Comment

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची