4th Vishwa Marathi Sammelan: कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये रंगणार चौथे विश्व मराठी संमेलन

नाशिक: जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक शहरात चौथे विश्व मराठी संमेलन भरवण्यात येणार आहे. नाशिक शहराला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होईल. त्यासाठी सर्व नाशिककरांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.



युवा पिढीसाठी विशेष उपक्रम:


येत्या २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत हे संमेलन होईल. या संमेलनानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रम होतील. त्यासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात येईल. संमेलनादरम्यान मराठी भाषा व साहित्याचा विकास, जागतिकीकरणाच्या युगातील मराठीची भूमिका, तंत्रज्ञानातील मराठीचा वापर, शिक्षणातील मातृभाषेचे स्थान तसेच सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन या विषयांवर विविध परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने व संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहेत. तसेच संमेलनात कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला सादरीकरणे, नाट्यप्रयोग, कथाकथन, पुस्तक प्रदर्शन, साहित्यिक संवाद तसेच युवा पिढीसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी साहित्य, कला व परंपरेचे दर्शन घडविणारी विविध प्रदर्शनेही या निमित्ताने भरविण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर विखुरलेल्या मराठी भाषिकांना एकत्र आणणे, मराठी भाषा व संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे तसेच नव्या पिढीत मराठीबाबत अभिमान निर्माण करणे हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.



शहराच्या सांस्कृतिक वैभवाला साजेसा सोहळा:


या संमेलनासाठी परदेशातून साहित्यिक हजर राहणार आहेत. यापूर्वीचे संमेलन पुणे येथे झाले. या संमेलनात पुस्तक आदान प्रदान हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. या संमेलनातही हा उपक्रम व्यापक स्तरावर राबविण्यात येईल. त्यासाठी नाशिककरांनी आपले योगदान द्यावे. त्यासाठी दहा रुपये वर्गणी ठेवण्यात येईल. या संमेलनाच्या मुख्य मंडपाला कवी कुसुमाग्रज नगरी असे नामकरण करण्यात येईल. अन्य दालनांना मान्यवरांची नावे देण्यात येतील. मराठी भाषा गौरव दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृती दिन तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाला विशेष महत्व असणार आहे. शहराच्या सांस्कृतिक वैभवाला साजेसा हा सोहळा ठरणार असून नाशिकची ओळख जागतिक स्तरावर अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.



संमेलनाची रूपरेषा:


मराठी भाषा विभागातर्फे ३५ जणांना साहित्य पुरस्कार, विश्व मराठी संमेलनाचा साहित्य भूषण पुरस्कार व नाशिकमध्ये एक विशेष पुरस्काराचे वितरण या संमेलनात करण्यात येणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी पुरस्कार्थीची नावे घोषित करण्यात येतील. संमेलन पूर्व २६ फेब्रुवारी रोजी मराठी बोलीभाषांचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे व सांगता मराठीतील प्रसिद्धी नाटक आमने-सामने याने होईल. २७ फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून शोभायात्रेने संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. सांयकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी पुरस्कार विजेत्यांबाबत परिसंवादाचे आयेाजन केले आहे. २८ फेब्रुवारी रोजी मनाचे श्लोक, लोककला, चित्रपट कार्यशाळा, एआय व मराठी भाषा, वारकरी संप्रदाय साहित्यप्रकार असे नानाविध कार्यक्रम होणार असून प्रत्येक दिवशी कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादवला डच्चू? एका खेळाडूचे पदार्पण; श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

IND vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या

Gold Silver Price Hike : सोन्या-चांदीच्या भावात तुफान तेजी! आजच खरेदी करणार असाल तर थांबा; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकन डॉलर आणि बॉंड यील्डमध्ये

Jantar Mantar Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील हिंसाचाराची होणार चौकशी; सुप्रीम कोर्टाकडून ५ सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना

नवी दिल्ली : जंतरमंतरसह देशातील विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार आणि

Vile Parle Crime News : मेसेज करून भेटायला बोलावलं; हात पकडला आणि ...; १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीनंतर शिक्षकाला अटक

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पूर्व परिसरात १६ वर्षीय शाळकरी मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून ४७ वर्षीय

National Teachers Awards : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर! देशभरातील ४८ शिक्षकांची निवड; महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली, दि. २२ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण