Reliance Industries Q1 Results: RIL तिमाही निकाल जाहीर रिलायन्स इंडस्ट्रीजला अभूतपूर्व EBITDA मध्ये वाढ Consolidated profit ७८% वाढला

प्रतिनिधी: आज गुंतवणूक ज्याची प्रतिक्षा करत होते तो क्षण आलेला आहे. सेवा, उत्पादन, रिटेल, इलेक्ट्रॉनिक्स, तेल, ओटीटी, एफएमसीजी बहुतांश क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशभरातील प्रमुख कंपन्यांपैकी एक रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही निकाल संध्याकाळी जाहीर झाला आहे. कंपनीला प्रचंड मजबूतीने एकत्रित नफा व निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील १५१३८ कोटींच्या तुलनेत ७८% वाढ होत यंदाच्या तिमाहीत २६९९४ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीच्या करोत्तर नफ्यात ( Profit after tax PAT) यामध्ये ३९% टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या महसूलातही (Revenue) मध्येही इयर ऑन इयर बेसिसवर ५.३% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील २३६२१७ कोटींच्या तुलनेत वाढत या तिमाहीत महसूल २४८६६९ कोटींवर पोहोचला आहे.

माहितीनुसार, कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) मध्येही वाढ झाली आहे. कंपनीच्या करपूर्व कमाईत (EBITDA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३६% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील ४२७४८ कोटींच्या तुलनेत वाढत या तिमाहीत ५८०२४ कोटींवर कमाई झाली आहे.

कंपनीच्या रिलायन्स जिओ कंपनी युनिटला इयर ऑन इयर बेसिसवर २५% नफ्यात वाढ झाली. मागील वर्षाच्या तिमाहीतील कामकाजातून मिळालेल्या महसूलात १९% वाढ झाली आहे तर कंपनी च्या करपूर्व कमाईत २४% वाढ झाली आहे. करपूर्व कमाईतील मार्जिनमध्ये २१० बीपीएसने वाढ झाली आहे. विशेषतः ग्राहकामागे सरासरी महसूल (Average revenue per user ARPU) १५% वाढत २०८.८ रूपयांवर गेला आहे.

कंपनीच्या रिलायन्स रिटेलने आज केल्विनेटर कंपनीचे अधिग्रहण जाहीर केले होते. कंपनीने आज निकालही जाहीर केला. तिमाही निकालात कंपनीला २८% अधिक नफा मिळाल्याने या तिमाही तील नफा ३२७१ कोटीवर पोहोचला आहे. कंपनीच्या करपूर्व कमाईत १३% वाढ झाली. तेल व केमिकल्स वर्टिकल ( उत्पादनात) कंपनीच्या महसूलात या तिमाहीत मात्र १.५% इयर ऑन इयर बेसिसवर घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतींत सातत्याने घसरण झाल्याने महसूलात घट झाली आहे.

एकूण रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निव्वळ देणी (Net Debt) मागील वर्षाच्या तिमाहीतील ११७०८३ कोटींच्या तुलनेत वाढ होय या तिमाहीत कंपनीच्या देणीतही वाढ झाल्याने निव्वळ देणी ११७५८१ कोटींवर गेली आहे. खासकरून आपल्या आगामी रिलायन्स एनर्जीचा व्यवसायावर निकालात कुठलेही भाष्य केलेले नाही.

निकालांवर भाष्य करताना अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले आहेत की, आरआयएलने आर्थिक वर्ष २०२६ ची सुरुवात मजबूत, सर्वांगीण ऑपरेशनल आणि आर्थिक कामगिरीने केली आहे. जागतिक मॅक्रोमध्ये लक्षणीय अस्थिरता असूनही, पहिल्या तिमाहीत आर्थिक वर्ष २०२६ साठी एकत्रित करपूर्व कमाईत (EBITDA) मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.'

बाजार तज्ञांनी कंपनीच्या फंडामेंटलमध्ये मजबूती असल्याचे भाकीत केले होते. किंबहुना कंपनी विश्लेषकांनी इथपर्यंत म्हटले होते की हा तिमाही निकाल कंपनीच्या १८ आर्थिक महिन्यातील सर्वा धिक उच्चांकी कामगिरी करणारा निकाल असेल. ३० जूनला कंपनीची तिमाही बैठक पार पडली. त्यामुळे रिलायन्स गुंतवणूकदारांना किती लाभांश जाहीर करेल याकडे भागभांडवलधारकांचे ल क्ष लागले आहे. बहुतांश गुंतवणूकदारांनी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सवर 'बाय' कॉल (Buy Call Rating) दिले आहे. ३७ पैकी ३४ विश्लेषकांनी कंपनीबाबत सकारात्मकता दाखवली आहे.
Comments
Add Comment

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबईजवळ ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, १४ कोटींची ड्रग्स जप्त

वसई : वसईच्या पेल्हार येथे मुंबई पोलिसांच्या झोन सहामधील अँटीनार्कॉटिक्स सेल आणि टिळक नगर पोलिसांनी मिळून

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाल बदने आला शरण

सातारा (Satara Doctor Death) : सातारा जिल्ह्यातील फलटणमधील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे