जुहू, दादर, माहीम चौपाट्यांची स्वच्छता महापालिकाच करणार

पालिका प्रशासन राबवणार स्वतःची यंत्रसामग्री


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने आतापर्यंत समुद्र चौपाट्यांची स्वच्छता खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून केली जात असली तरी आता मात्र महापालिका स्वतःच्या कर्मचाऱ्यांसह करणार आहे. यासाठी लागणाऱ्या टॅक्टरसह बीच सफाई मशिन्स, टॅक्टर ट्रॉली तसेच रिकड स्टिअर लोडर अर्थात बीच क्लोनिंग, रॉकबकेट आणि ग्रॅपल बकेटची खरेदी आता महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे या मशिन्सच्या माध्यमातून चौपाट्यांची स्वच्छता महापालिका राखणार आहे.


मुंबईतील गिरगाव, दादर माहीम, जुहू, वर्सोवा, मार्वे, चिंबई, गोराई आदी समुद्र चौपाट्यांवर भरती आणि ओहोटीच्या पाण्यामुळे समुद्रातील बरेचसे तरंगते तसेच प्लास्टिक आदींचा कचरा किनाऱ्यावर फेकला जातो. त्यामुळे या चौपाट्यांवर भेटी देण्यास येणाऱ्या पर्यटकांसह पाहुण्यांसमोर चौपाट्यांवर अस्वच्छता पसरुन गलिच्छ दर्शन घडते. त्यामुळे या सर्व चौपाट्यांची स्वच्छता खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून केली जात आहे. या समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता यंत्र आणि मनुष्य बळाच्या सहाय्याने स्वच्छता राखली जात आहे. यापूर्वी जुहू आणि दादर माहिम समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी


सहा वर्षांसाठी नेमलेल्या अनुक्रमे स्पेक्ट्रोन इंजिनिअरींग आणि कोस्टल क्लिअर एनव्हायरो या कंपनीचे कंत्राट अनुक्रमे जुलै २०२४ आणि डिसेंबर २०२४मध्ये संपुष्टात आले. तेव्हापासून या नवीन कंत्राटदाराची नेमणूक न करता महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने आपल्याच कामगारांच्या मदतीने सफाई केली जात आहे.


मात्र, ही सफाई करताना मशिनरीचा वापर करता यावा पासाठी महापालिकेच्यावतीने पासाठीची सफाई केली जाणार आहे. या मशिनरीची खरेदी आणि त्यांची देखभाल खासगी कंपनीकडून होणार असून यासाठी साफसफाईकरता महापालिकेचे कामगार तैनात केले जाणार आहे. महापालिकेच्यावतीने ही साफसफाई करताना या स्वच्छतेसाठीची यंत्रसामुग्रीचा वापर केला जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. या यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून आता महापालिकेच्यावतीने चौपाट्यांची साफसफाई राखली जाणार आहे.



७.५२ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार


महापालिकेच्यावतीने जुहू चौपाटीसाठी २ टॅक्टरसहित बीच साफसफाईची मशिन तसेच ३ ट्रॅक्टर ट्रॉली आणि १ स्किड स्टिअर लोडर तसेच दादर माहिम चौपाटीसाठी १ ट्रॅक्टरसह बीच साफसफाई मशिन, कचरा दाबयंत्र २ आणि ट्रॅक्टर ट्रॉली २ अशाप्रकारची खरेदी केली जात आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया मागील मे महिन्यात पूर्ण करण्यात आली आहे. या मशिनरीची खरेदी साठी राम इंजिनिअरींग अँड कस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये स्वच्छतेच्या कामांसाठीची मशिनरी खरेदीसह सहा वर्षांची देखभाल दुरुस्तीसाठी विविध करांसह २७.५२ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून