जुहू, दादर, माहीम चौपाट्यांची स्वच्छता महापालिकाच करणार

पालिका प्रशासन राबवणार स्वत:ची यंत्रसामग्री


मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीन आतापर्यंत समुद्र चौपाट्यांची स्वच्छता खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून केली जात असली तरी आता मात्र महापालिका स्वत:च्या कर्मचाऱ्यांसह करणार आहे. यासाठी लागणाऱ्या टॅक्टरसह बीच सफाई मशिन्स, टॅक्टर ट्रॉली तसेच स्किड स्टिअर लोडर अर्थात बीच क्लीनिंग, रॉकबकेट आणि ग्रॅपल बकेटची खरेदी आता महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे या मशिन्सच्या माध्यमातून चौपाट्यांची स्वच्छता महापालिका राखणार आहे.


मुंबईतील गिरगाव, दादर माहीम, जुहू, वर्सोवा, मार्वे, चिंबई, गोराई आदी समुद्र चौपाट्यांवर भरती आणि ओहोटीच्या पाण्यामुळे समुद्रातील बरेचसे तरंगते तसेच प्लास्टिक आदींचा कचरा किनाऱ्यावर फेकला जातो. त्यामुळे या चौपाट्यांवर भेटी देण्यास येणाऱ्या पर्यटकांसह पाहुण्यांसमोर चौपाट्यांवर अस्वच्छता पसरुन गलिच्छ दर्शन घडते. त्यामुळे या सर्व चौपाट्यांची स्वच्छता खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून केली जात आहे. या समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता यंत्र आणि मनुष्य बळाच्या सहाय्याने स्वच्छता राखली जात आहे. यापूर्वी जुहू आणि दादर माहिम समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी सहा वर्षांसाठी नेमलेल्या अनुक्रमे स्पेक्ट्रोन इंजिनिअरींग आणि कोस्टल क्लिअर एनव्हायरो या कंपनीचे कंत्राट अनुक्रमे जुलै २०२४ आणि डिसेंबर २०२४मध्ये संपुष्टात आले. तेव्हापासून या नवीन कंत्राटदाराची नेमणूक न करता महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने आपल्याच कामगारांच्या मदतीने सफाई केली जात आहे.


मात्र, ही सफाई करताना मशिनरीचा वापर करता यावा यासाठी महापालिकेच्यावतीने यासाठीची सफाई केली जाणार आहे. या मशिनरीची खरेदी आणि त्यांची देखभाल खासगी कंपनीकडून होणार असून यासाठी साफसफाईकरता महापालिकेचे कामगार तैनात केले जाणार आहे. महापालिकेच्यावतीने ही साफसफाई करताना या स्वच्छतेसाठीची यंत्रसामृग्रीचा वापर केला जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. या यंत्रसामृग्रीच्या माध्यमातून आता महापालिकेच्यावतीने चौपाट्यांची साफसफाई राखली जाणार आहे.



७.५२ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार


महापालिकेच्यावतीने जुहू चौपाटीसाठी २ टॅक्टरसहित बीच साफसफाईची मशिन तसेच ३ ट्रॅक्टर ट्रॉली आणि १ स्किड स्टिअर लोडर तसेच दादर माहिम चौपाटीसाठी १ ट्रॅक्टरसह बीच साफसफाई मशिन, कचरा दाबयंत्र २ आणि ट्रॅक्टर ट्रॉली २ अशाप्रकारची खरेदी केली जात आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया मागील मे महिन्यात पूर्ण करण्यात आली आहे. या मशिनरीची खरेदी साठी राम इंजिनिअरींग अँड कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये स्वच्छतेच्या कामांसाठीची मशिनरी खरेदीसह सहा वर्षांची देखभाल दुरुस्तीसाठी विविध करांसह २७.५२ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत ॲप-आधारित वाहन चालकांवर कारवाई; नियम मोडल्यास थेट दंड आणि एफआयआर!

मुंबई : राज्य शासनाच्या नव्या आदेशांनुसार, ॲपच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे पालन न

गडचिरोलीतील भामरागडला यंदाच्या वर्षी पाचव्यांदा पुराचा फटका

गडचिरोली : मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला असतानाच विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यालाही

Sameer Wankhede : समीर वानखेडेचा आर्यन खानवर मानहानीचा आरोप; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रकरणी आज दिल्ली हायकोर्टात महत्वपूर्ण सुनावणी

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या त्याच्या दिग्दर्शन पदार्पणामुळे चर्चेत असतानाच,

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश मुंबई : देवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास

गोरेगावमध्ये होणार म्हाडाची ३८ मजली व्यावसायिक इमारत

राज्य सरकारकडे संबंधित प्रस्ताव सादर मुंबई : गोरेगाव (पश्चिम) येथील पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या

गुंतवणूकदारांनी राज्यातील जहाज बांधणी उद्योगात योगदान द्यावे

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे आवाहन मुंबई : महाराष्ट्रात जहाज बांधणी आणि बंदरे क्षेत्रात