निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक वाढ रिअल्टी (०.३९%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.३९%), फार्मा (०.५०%), मेटल (०.२९%) समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक घसरण मिडस्मॉलकॅप फायनांशियल सर्व्हिसेस (०.४२%), मिड स्मॉलकॅप एक्स बँक (०.३०%), मिडस्मॉलकॅप आयटी व टेलिकॉम (०.११%), पीएसयु बँक (०.६१%), आयटी (०.२२%) समभागात घसरण झाली. सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एडब्लूएल अँग्री बिझनेस (६.५४%), गोदावरी पॉवर (५.७९%), पीएनसी इन्फ्राटेक (५.५१%), नुवामा हेल्थ (३.७३%), सम्मान कॅपिटल (२.७१%),अजंता फार्मा (२.३६%), कल्पतरू प्रोजेक्ट (२.०२%),आनंद राठी वेल्थ (१.६२%),महानगर गॅस (१.५१%), लेमन ट्री हॉटेल (१.१९%), ओबेरॉय रिअल्टी (१.०१%), सिमेन्स एनर्जी इंडिया (२.१४%), यु नायटेड स्पिरीट (१.२२%), सीजी पॉवर (१.२२%), झायडस लाईफ सायन्स (०.९७%), वरूण बेवरेज (०.८५%), जिंदाल स्टील (०.६८%), एनटीपीसी (०.३८%), एचडीएफसी बँक (०.१२%), जिओ फायनाशिंयल सर्व्हिसेस (०.०५%) समभागात झाली.
सुरुवातीच्या कलात सर्वाधिक घसरण नेटवर्क १८ इंडिया (२.३६%), ओला इलेक्ट्रिक (१.९२%), आरबीएल बँक (१.४३%), युनियन बँक (१.४२%), जेएसडब्लू एनर्जी (१.४२%), वारी इंडस्ट्रीज (१.३८%), सिमेन्स एनर्जी (१.४२%), टेक महिंद्रा (१.२१%),वन ९७ (०. ९७%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (०.८६%), आयसीआयसीआय बँक (०.७५%), इन्फोसिस (०.२३%), इंटरग्लोब एव्हिऐशन (०.७९%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.७८%), विप्रो (०.२५%) समभागात झाली आहे. युएसमधील टेरिफचा (Tariff) दबाव
आंतरराष्ट्रीय बाजारात कायम असताना आता जपानची निर्यात आकडेवारी आली आहे. अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात ही घसरण झाल्याने आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात घसरण झाली आहे. तज्ञांच्या मते ही घसरण ०.५% होऊ शकते असे म्हटले जात होते मात्र प्रत्यक्षात १.७% घसरण मे महिन्यात आल्याने ही दबाव पातळी निर्माण झाली आहे. काल युएस बाजारात डाऊ जोन्स (०.१७%) बाजारात घसरण झाल्यानंतर मात्र एस अँड पी ५०० (०.३२%), नासडाक (०.२५%) बाजारात वाढ झाली होती. सकाळी आ शियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.१४%), कोसपी (०.११%), वगळता सकाळी १० वाजेपर्यंत इतर बाजारात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ सेट कंपोझिट (२.७२%), स्ट्रेटस टाईम्स (०.४०%), जकार्ता कंपोझिट (१.१७%) बाजारात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,'शेअर बाजार गेल्या दोन महिन्यांपासून ज्या एकत्रीकरणाच्या श्रेणीत अडकला आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणतेही ट्रिगर नाहीत. भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करारालाही बाजाराने सवलत दिली आहे, ज्यामुळे ती श्रेणी निर्णायकपणे तोडून तीक्ष्ण तेजीची शक्यता उरलेली नाही. एक सकारात्मक आणि आश्चर्यकारक घटक जो तेजीला चालना देऊ श कतो तो म्हणजे २०% पेक्षा खूपच कमी दर, उदाहरणार्थ १५%, जो बाजाराने कमी केलेला नाही. म्हणून, व्यापार आणि शुल्क आघाडीवरील घडामोडींकडे लक्ष ठेवा. आयटी क्षेत्राचे निकाल निराशाजनक आहेत आणि म्हणूनच, एकूण बाजारावर ओढाताण राहू श कते.खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बँका आता बचावात्मक स्थितीत आहेत. बाजार पहिल्या तिमाहीच्या निकालांमध्ये एनआयएम संकुचनला कमी करत आहे. परंतु तिसऱ्या तिमाहीपासून हे उलट होईल ज्यामुळे त्यांना आता चांगली खरेदी मिळेल. मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक क्षेत्रातील बँका आकर्षक आहेत.'
आज एकूणच परिस्थिती पाहता आज बाजारात संथ चढउतार होण्याची शक्यता अधिक असून कदाचित बाजार सपाट (Flat) अथवा किरकोळ वाढीने बंद होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भारतीय बाजारातील घरगुती गुंतवणूकदारांनी कालच्या बाजारात मोठ्या प्रमाणात विश्वास दाखविल्यानंतर बाजारात 'हिरवा कंदील' मिळाला होता. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली रोख गुंतवणूक काढून घेण्याचा ट्रेंड सुरु ठेवला असला तरी टेरिफ घोषणे व्यतिरिक्त इतर कुठला विशेष ट्रिगर बाजारात दिसला नाही. यामुळे दुपारपर्यंत बाजारात आज छोटी रॅली होईल की नाही हे पाहणे अधिक संयुक्तिक ठरेल.