आषाढी यात्रेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांकडून कोट्यवधी रुपयांचे दान

  74

पंढरपूर : यंदाच्या आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी १० कोटी ८४ लाख रुपयांचे दान केले. तसेच सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्त निवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.


गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले कि, यंदा आषाढी कालावधीत दर्शन रांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना मंदिर समितीने केल्या होत्या. यंदाच्या वारीत २६ जून ते १० जुलै या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ७५ लाख ५ हजार २९१ रुपये अर्पण केले तर २ कोटी ८८ लाख ३३ हजार ५६९ रुपये देणगी, ९४ लाख ४ हजार ३४० रुपये लाडू प्रसाद विक्री, ४५ लाख ४१ हजार ४५८ रुपये भक्तनिवास, १ कोटी ४४ लाख ७१ हजार ३४८ रुपये हुंडीपेटी, ३२ लाख ४५ हजार ६८२ रुपये परिवार देवता तसेच २ कोटी ५९ लाख ६१ हजार ७६८ रुपये सोने-चांदी अर्पण, अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्र, फोटो, मोबाइल लॉकर आदी माध्यमांतून १२ लाख ४५ हजार ७५ रुपये व ३ इलेक्ट्रिक रिक्षा / बसचे ३२ लाख इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.


मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ ७७ लाख ६ हजार ६९४ रुपये अर्पण, २ कोटी ६९ लाख २२ हजार ५७८ रुपये देणगी, ९८ लाख ५३ हजार रुपये लाडू प्रसाद विक्री, ५० लाख ६० हजार ४३७ रुपये भक्तनिवास, ९३ लाख ५५ हजार ७३ रुपये हुंडीपेटी, ३१ लाख ७९ हजार ६८ रुपये परिवार देवता तसेच २ कोटी २१ लाख ५३ हजार ६०१ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाइल लॉकर आदी माध्यमांतून ६ लाख २८ हजार १०९ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.सन २०२४ च्या आषाढी यात्रेत ८ कोटी ४८ लाख ५८ हजार ५६० रुपये व यावर्षीच्या यात्रेत १० कोटी ८४ लाख ८ हजार ५३१ इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत २ कोटी ३५ लाख ४९ हजार ९७१ इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या या दानातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना