Airtel Perplexity Partnership: एअरटेलची पर्प्लेक्सीटी सोबत महत्वाकांक्षी भागीदारी ! प्रत्येक युजरला 'हे' १७००० रूपयांचे सबस्क्रिप्शन फ्री

  71

मुंबई: भारती एअरटेल (Bharti Airtel Limited) आणि पर्प्लेक्सीटी (Perplexity)भागीदारी करून आपल्या सर्व ३६० दशलक्ष ग्राहकांना १२ महिन्यांचे पर्प्लेक्सीटी प्रो सब्सक्रिप्शन मोफत देणार आहे. गुरूवारी एअरटेलने पर्प्लेक्सीटीशी भागीदारी करणार अस ल्याचे घोषित केले आहे.परप्लेक्सिटी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल आहे जे विद्यार्थ्यांना स्वयंशिक्षणासाठी, काम करणाऱ्या व्यवसायिंकासाठी किंवा घर चालविण्यासाठी असो, पर्प्लेक्सीटी प्रो वापरून वापरकर्त्यांना (Users) ला माहिती शोधण्याचा, शिक ण्याचा आणि अधिक स्मार्ट करण्याचा एक सोपा मार्ग उपलब्ध होत आहे. वापरकर्त्यांना संभाषणात्मक भाषेत रिअल-टाइम (Real time), अचूक (Accurate)आणि सखोल (Indepth) संशोधन करण्यासाठी हे एआय मदत करते. हे ग्राहकांना वेब पृष्ठांच्या सूची पासून वाचण्यास सोप्या उत्तर शोधण्यापर्यंत मदत करते.

हे प्रो चे सब्सक्रिप्शन, ज्याची किंमत १७००० आहे, आता एअरटेलच्या सर्व ग्राहकांना (मोबाइल, वाय-फाय आणि डीटीएच) एका वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. हे एका भारतीय टेलिकॉम कंपनीसोबत पर्प्लेक्सीटीची ही पहिलीच भागीदारी चिन्हांकित करत आहे. एअरटेल थँक्स ॲपवर लॉगिन करून सर्व एअरटेल वापरकर्त्यांना या ऑफरचा लाभ उचलता येईल.

या भागीदारीबाबत टिप्पणी करताना गोपाल विठ्ठल उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकभारती एअरटेल म्हणाले की, 'एअरटेलच्या ग्राहकांसाठी स्वतःची अत्याधुनिक एआय क्षमता सादर करणाऱ्या पर्प्लेक्सीटी सोबत दृश्य पालटणारी ही भागीदारी आम्ही आनंदाने जाहीर करत आहोत. लाखो वापरकर्त्यांना शक्तिशाली आणि वास्तविक काळातील ज्ञानाचे साधन, या सहयोगामुळे चुटकीसरशी उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. आमच्या ग्राहकां ना आत्मविश्वासाने आणि सहज रूपाने डिजिटल जगातील उदयास येणाऱ्या कल मध्ये मार्गदर्शन करण्यात मदत करण्यावर भारतातील अशा प्रकारच्या या पहिल्या जेन-एआय भागीदारीचा भर असणार आहे.'

अरविंद श्रीनिवास, सहसंस्थापक सीईओ  पर्प्लेक्सीटी म्हणाले, 'विद्यार्थी असो, काम करणारा व्यावसायिक असो, किंवा घर चालविणे असो, ही भागीदारी अचूक, विश्वासू आणि व्यावसायिक दर्जाचे एआय भारतातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा ए क चित्तवेधक मार्ग आहे. पर्प्लेक्सीटी प्रो वापरून वापरकर्त्यांना माहिती शोधण्याचा, शिकण्याचा आणि अधिक करण्याचा एक स्मार्ट, सोपा मार्ग उपलब्ध होत आहे.'

ग्राहक लाभ हे 1 वर्षासाठी वैध असलेल्या पर्प्लेक्सीटी प्रो एआय च्या चालू सबस्क्रिप्शनवर आधारित आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित (अटी व शर्ती लागू ) असतील असे कंपनीने यावेळी म्हटले. पर्प्लेक्सिटी प्रो आवृत्ती व्यावसायिक, जास्त वापरकर्ते यांच्यासाठी वर्धित क्षमता (Enhanced Capabilities) प्रदान करते. पर्प्लेक्सिटी प्रो मध्ये प्रति वापरकर्ता अधिक दैनिक प्रो शोध, प्रगत एआय मॉडेल्स (उदा., GPT 4.1, Claude) मध्ये प्रवेश आणि विशिष्ट मॉडेल्स निवडण्याची क्षमता, सखोल संशोधन, प्रतिमा निर्मिती, फाइल अपलोड आणि विश्लेषण, तसेच पर्प्लेक्सिटी लॅब्स, कल्पनांना जिवंत करणारे एक अत्याधुनिक साधन समाविष्ट आहे. एका वर्षासाठी हे सगळ्या एअरटेल वापरकर्त्यांना मोफत असेल. मोबाईल, वायफाय, डीटीएच माध्यमातून या सुविधेचा लाभ कंपनीच्या ग्राहकांना घेता येईल. Airtel Thanks App यावर ग्राहक लॉग इन करत ही सुविधा वापरू शकतात.
Comments
Add Comment

राज्यात पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा!

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता मुंबई: भारतीय हवामान विभागाने

'प्रहार' Exclusive: शेअर बाजारात 'धोके' दुसरीकडे 'मजबूत' अर्थव्यवस्था गुंतवणूकदारांसाठी 'हा' सल्ला गेल्या आठवड्यात असा होता बाजार !

मोहित सोमण: मागील संपूर्ण आठवडा शेअर बाजारासाठी खडतर होता. सेन्सेक्स व निफ्टीत चांगले संकेत नाहीत. जागतिक

दहीहंडीला लागले गालबोट, आतापर्यंत झाले एवढे मृत्यू

मुंबई : दहीहंडी उत्साहात साजरी होत असताना मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे दहीहंडी उत्सवालाच गालबोट

Gautami Patil : काळी साडी, झटकेदार स्टेप्स आणि थरारक फ्लायिंग किस, गौतमी पाटीलने वाढवला उत्साहाचा तापमान

मुंबई : मुंबईच्या मागाठाणे येथे पारंपरिक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. (Gautami patil dance

'शिंदेंना लॉटरी लागली, मुख्यमंत्री झाले, पण टिकवता आली... मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा वाद हा काही राज्याला नवा नाही. मंत्री गणेश नाईक

कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकाची ऐतिहासिक कामगिरी

मुंबई : दहीहंडीच्या निमित्ताने सर्वत्र ढाकूमाकूम... चा उत्साह दिसत आहे. या उत्साही वातावरणात दोन गोविंदा पथकांनी