पाणी’ चित्रपटाची २५ पुरस्कारांवर मोहोर!

वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला ‘पाणी’, आदिनाथ कोठारे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान!


मुंबई: आदिनाथ कोठारे दिग्दर्शित या चित्रपटाने आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये तब्बल २५ मानाचे पुरस्कार पटकावून इतिहास रचला आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा प्रमुख विभागांचा समावेश असल्याने ‘पाणी’ हा वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला मराठी चित्रपट ठरला आहे.राजश्री एंटरटेन्मेंटने पर्पल पेबल पिक्चर्स आणि कोठारे व्हिजन प्रा. लि. यांच्या सहकार्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेला ‘पाणी’ हा चित्रपट आता यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.


मराठवाड्याच्या ‘जलदूत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमंत केंद्रे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट केवळ एक बायोपिक नसून, समाजाला पाण्याचे महत्त्व पटवून देणारा एक सशक्त आणि संवेदनशील संदेश देतो.


पुरस्कारांची लयलूट
राजश्री एंटरटेन्मेंटने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘पाणी’ला 'पर्यावरण संरक्षण/संरक्षणावरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म'साठी '६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' मिळाला होता. न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये आदिनाथ कोठारे यांना सर्वोत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘पाणी’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन, सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर या विभागांत बाजी मारली. झी चित्र पुरस्कार सोहळ्यातही या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक हे पुरस्कार मिळवले.


याव्यतिरिक्त, रेडिओ सिटी सिने अवॉर्ड मराठी - सिझन ८ मध्ये सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट चित्रपट हे पुरस्कार, तर म. टा. सन्मानमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट गीतकार असे पुरस्कार प्राप्त झाले. एनडीटीव्ही मराठी अवॉर्ड्समध्येही ‘पाणी’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट संकलन विभागात बाजी मारली.


दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांची कृतज्ञता
या यशाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना दिग्दर्शक आदिनाथ कोठारे म्हणाले, “या यशाचे श्रेय संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांना जाते. प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिलं, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. नेहा बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा, सिद्धार्थ चोप्रा यांचे मनापासून धन्यवाद. त्यांच्यामुळेच आज हे शक्य होऊ शकले.''


ज्यांना ‘पाणी’ चित्रपटगृहात पाहायची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की हा चित्रपट आता अमेझॉन प्राईमवर मराठीसह हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. सामाजिक विषयावर आधारित असला तरी, या चित्रपटात मनोरंजन, संगीत आणि उत्तम अभिनयाची त्रिवेणी अनुभवता येणार आहे.


आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी' चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये