धक्कादायक! मुंबईत सावत्र पित्याने चार वर्षाच्या चिमुरडीचा घेतला जीव, कारण ऐकून व्हाल हैराण

मुंबई: मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका सावत्र पित्याने आपल्या चार वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीसोबत वेळ घालवता येत नव्हता म्हणून या सावत्र पित्याने हे कृत्य केले.


या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान या हत्येचा उलगडा झाला. दरम्यान, वरळीवरून आरोपी इमरान शेखला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुकली रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असयाची. यामुळे इमरान शेखला आपल्या पत्नीसोबत वेळ घालवता येत नसे. याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. हाच राग मनात ठेवून आरोपी पित्याने ही क्रूर हत्या केली. तसेच आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून मृतदेह कुलाबा येथील समुद्रात फेकला. मात्र दुसऱ्यादिवशी सकाळी ससून डॉकजवळ चिमुरडीचा मृतदेह सापडताच पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासाच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी आरोपी पित्याची कसून चौकशी केली. या चौकशीतून अखेर सत्य समोर आले. त्यानंतर या सावत्र पित्याला अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १० हजार ३०० मतदान केंद्र

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी विधानसभेतील मतदार केंद्राप्रमाणेच केंद्र

'मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी कृतीतून संकल्प करू'

मुंबई : शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे)