मुंबई : पासपोर्ट अर्जदारांची निवासी पत्त्याबाबतची व्हेरिफिकेशन प्रक्रिया ही राज्याच्या गृह विभागाकडून केंद्र शासनाच्या ठरवलेल्या मानक कार्यपद्धती (SOP) नुसारच केली जाते, असे गृह विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पासपोर्ट अधिनियम (Passport Act) हा केंद्र सरकारचा कायदा असून, याअंतर्गत निवासी पत्ता पडताळणी बरोबरच अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, नागरिकत्व आणि अन्य आवश्यक बाबींची तपासणी केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने ती अत्यंत काटेकोर आणि नियमबद्ध पद्धतीने केली जाते.
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने बोलताना देवेंद्र ...
पासपोर्ट अर्ज करताना अर्जदाराने जर स्थलांतर केले असेल, तर अर्जात स्थायी (Permanent Address) आणि सध्याचा पत्ता (Current Address) अशी दोन्ही माहिती देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत भाडेकरुच्या निवासी भाडे करारनाम्य मध्ये नमूद पत्त्याचाही स्वीकार केला जातो, परंतु त्याची पडताळणी व्हेरिफिकेशन दरम्यान केली जाते. संबंधित एसओपी आणि कायद्याच्या अधीन राहूनच पोलीस प्रशासन आपले कर्तव्य बजावत असते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती माहिती अर्जात नमूद करावी आणि आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन गृह विभागाने केले आहे.