gold silver marathi news: आंतरराष्ट्रीय पातळीत दबाव पण भारतात सोन्याचांदीत 'मोठी' घसरण ! गुंतवणूकदारांसाठी आज खरेदीची सुवर्णसंधी!

प्रतिनिधी: पाच दिवसांच्या सातत्याने भाववाढीनंतर आज अखेर सोन्याने विश्रांती घेतली आहे. थोडीथोडकी नाही तर मोठ्या संख्येने वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची नवी सुवर्णसंधी चालून आली आहे. ' गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात थेट ४९ रूपयांनी वाढत ९९२८ रुपयांवर दर गेला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४५ रूपये घट झाल्याने दर ९१०० रूपयांवर गेला असून १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३७ रूपये घट झाल्याने दर ७४४६ रुपयांवर गेला आहे. याशिवाय माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४९० रूपयांनी घसरण होत दर ९९२८० रूपयांवर गेले. २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४५० रूपयांनी घसरण होत दर ९१००० रूपयांवर गेले असून १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ३७० रूपये घसरण झाल्याने दर ७४४६० रूपयांवर गेले आहेत.


आकडेवारीनुसार मुंबईसह देशभरातील प्रमुख बहुतांश शहरात सरासरी २४ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ९९२८ रूपये, २२ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ९१००, तर १८ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ७५०० रूपये पातळीवर स्थिरावले आहेत.


आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात (Gold Futures Index) दुपारपर्यंत २.३८% वाढ झाल्याने सोने दर ३३४८.५२ रूपये प्रति औंसवर गेला आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.५०% वाढ दुपारपर्यंत झाल्याने दरपातळी ३३४१.९३ रूपये प्र ति औंसवर गेली आहे. दुपारपर्यंत भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) बाजारातील सोन्याच्या निर्देशांक सोने ०.३०% वाढल्याने एमसीएक्स गोल्ड दरपातळी ९७५०० रुपयांवर गेली आहे. भारतीय बाजारात आज पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर सोन्यात घसरण झाली आहे.


प्रामुख्याने ही घसरण बाजारातील सोन्याच्या पुरवठा पूर्ववत झाल्यामुळे घटलेल्या मागणीमुळे, ईटीएफ (ETF Gold) नफा बुकिंग सुरू झाल्याने भारतीय बाजारात घसरण झाली आहे. मात्र पुन्हा एकदा युएस बाजारातील सोन्यात दुपारपर्यंत वाढ सुरु झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने युएसमधील सीपीआय आकडेवारी जाहीर झाल्यानंतर होत आहे. वाढत्या महागाईचे आकडे, फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का ? ही अनिश्चितता या पार्श्वभूमीवर ही वाढ पुन्हा एकदा सुरू झाली ज्यात अनिश्चिततेत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे युएस गुंतवणूकदार वळल्याचे एकूणच चित्र उभे आहे. आजही डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने भारतीय सराफा बाजारातील कमोडिटीत सपोर्ट लेवल अद्याप मिळालेली नाही. आज तर तब्बल २२ पैशाने रूपया कोसळल्याने सोने बाजारात त्याचा फटका बसला ज्याचा फायदा गुंतवणूकदारांना नफा बुकिंगला (Profit Booking) होऊ शकतो.


चांदीनेही सोन्याचा कित्ता गिरवला !


चांदीच्या दरात गेल्या पाच दिवसात नवीन उच्चांक प्रस्थापित झाल्यानंतर आज चांदीनेही सराफा बाजारात एकप्रकारे किरकोळ विश्रांती घेतली आहे. 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीचे प्रति ग्रॅम दर १ रूपयाने घसरल्याने ११४ रूपये प्रति ग्रॅम दर आज सुरू आहे. प्रति किलो किंमतीत १००० रूपयांची घसरण झाल्याने चांदीचे दर प्रतिकिलो ११४००० रूपयांवर पोहोचले आहेत.  जागतिक बाजारपेठेत चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांक (Silver Futures Index) यामध्ये मात्र सकाळपर्यंत घसरलेला निर्देशांक दुपारपर्यंत ०.३५% वाढला. प्रामुख्याने नव्या अस्थिरतेचा घडामोडीचा फटका युएसमध्ये बसत असल्याने जागतिक बाजारपेठेत पुन्हा चांदीत दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याखेरीज वाढीव चांदीची औद्योगिक क्षेत्रातील मागणी, घटता पुरवठा, टे रिफचे अस्थिरतेचे कागदी घोडे यामुळे चांदीचे दरही वेगळ्या संक्रमणातून जात आहेत. भारतीय एमसीएक्स (MCX) बाजारात सोन्याप्रमाणेच चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत पुन्हा वाढ सुरु झालेली आहे. दुपारी चांदी निर्देशांकात ०.४६% वाढ झाल्याने दरपात ळी १११९९७ रूपयांवर पोहोचली आहे.


एमसीएक्स बाजारात एकूणच ऑगस्ट महिन्याचा विचार केल्यास कमोडिटी बाजारात ऑगस्ट डिलिव्हरीसाठी सोन्याचे करार ४९ किंवा ०.०५% ने वाढून, प्रति १० ग्रॅम दर ९७,२६० दरपातळीवर पोहोचला ज्यामध्ये एक्सचेंज मधील आकडेवारी नुसार, १०,६९५ लॉटचा व्यवसाय झाला. दरम्यान, सप्टेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचे करार ६६ किंवा ०.०६% ने कमी होऊन १,११,४२० प्रति किलोग्रॅम झाले आहेत. त्यामुळे आजही सोन्याचांदीच्या दरात कमालीची अस्थिरता दर्शवली जात आहे. चांदीशिवाय कमोडिटी बाजारात झिंक, तांबे, अल्युमिनियमचा किंमती स्वस्त झाल्या. तज्ञांच्या मते, चांदीच्या दरात मात्र घरगुती बाजारातील वाढती मागणी, जागतिक परिणाम म्हणून किंमत स्थिर राहू शकते.'


त्यामुळेच आगामी रक्षाबंधन, सावन अशा विविध सणांसाठी सोने चांदीच्या गुंतवणूकीत घसरलेल्या किंमतीत खरेदी करणे सोयीस्कर व किफायतशीर ठरत शकते.

Comments
Add Comment

स्थानिक निवडणूकांचे बिगुल वाजणार! पुढील आठवड्यात घोषणा

पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतीची निवडणूक मुंबई : पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार अवघ्या १५ मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला वेग; भांडुप जंक्शनवर एका रात्रीत ४५० टन वजनाचा बसवला स्टील स्पॅन

मुंबई : केवळ एका रात्रीत मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंता पथकाने भांडुप ते सोनापूर

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो होणार सहा डब्यांची; प्रवाशांची होणार गर्दीतून सुटका

३२ अतिरिक्त डबे खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू मुंबई : मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता लवकरच गर्दीमुक्त

अमेरिकेकडे १५० वेळा जग उडवून देण्याइतकी पुरेशी अण्वस्त्र; ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

चीन, उत्तर कोरिया, पाकिस्तान आणि रशियाकडून अणुचाचण्यांचा धोका वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

हापूस आंबा बाजारात आला, असा झाला पहिला सौदा!

कोल्हापूर : समितीचे श्री शाहू मार्केट यार्डमधील जावेद इब्राहिमभाई बागवान यांच्या जे बी अँड सन्स फळ विभाग गाळा