Fed Inflation US: भारतीय गुंतवणूकदारांना दूरदृष्टीने हादरवून टाकणारी बातमी ! अमेरिकेतील 'या' आर्थिक घडामोडी निर्णायक ठरणार ?

  86

मोहित सोमण:जागतिक अर्थव्यवस्थेला व संपूर्ण जगभरातील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना हादरवणारी बातमी समोर आली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत वरचढ असलेल्या युएसमधील अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे त्याचा दूरगामी परिणाम व फटका आशिया शेअर बाजारातही कदाचित भारतात देखील बसण्याची शक्यता आहे. युएसमध्ये जाहीर केलेल्या ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index CPI) यामध्ये अपेक्षेपेक्षाही अधिक ०.३% वाढ जून महिन्यात झाली आहे. परिणामी अमेरिके तील बाजारात सगळ्याच प्रकारच्या वस्तूत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे, कॉफीपासून ते इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या प्रकारच्या वस्तूत मोठी भाववाढ झाली आहे. दिवसेंदिवस अमेरिकेतील महागाई (Inflation) मोठ्या संख्येने वा ढत आहे. याच परिस्थितीत अमेरिकेतील सरकारकडे वेगवेगळ्या मार्गाने महसूल वाढवण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. पर्यायाने ट्रम्प प्रशासन आयात दरातील टेरिफमध्ये आणखी मोठी वाढ करू शकते असे म्हटले जात आहे.


स्थानिक बाजारपेठेला पाठिंबा देतानाच परकीय वस्तूवर भले रेसिप्रोकल टेरिफ आकारून युएस वस्तूंना पुन्हा मागणी उत्पन्न करण्यासाठी ट्रम्प सरकारचा प्रयत्न आहे. अशात महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने फेड व्याजदरात सप्टेंबरमध्ये कपात शक्य ना ही मात्र सातत्याने डोनाल्ड ट्रम्प हे फेडरल रिझर्व्ह बँकेवर विशेषतः बँकेचे प्रमुख जेरोमी पॉवेल यांच्यावर दबाव आणत आहेत. मात्र त्यांनी अजूनही दरकपात अथवा ट्रम्प यांना प्रत्युत्तर न दिल्याने ट्रम्प यांची फेडवर नाराजी मोठ्या प्रमाणात वाढत आहे दुसरीकडे ट्रम्प प्रशासन मात्र महागाई आटोक्यात असल्याचे सांगत फेड दर कपातीची सातत्याने मागणी करत आहे. माहितीनुसार, फेडरल बँक अजूनही दरकपात करण्यासाठी विचाराधीन नाही. संपूर्ण परिस्थितीचे आकलन करूनच सप्टेंबरमध्ये पुढील निर्णय बँकेकडून घेतला जाऊ शकतो.


अमेरिकेतील महागाई व अस्थिरतेचा फटका भारतीय शेअर बाजारात वारंवार दिसत असतानाच युएसमधील महागाई, टेरिफ दरवाढ, फेड व्याजदरात कपातीवर अमेरिकेची अस्पष्टता, इराण इस्त्राईल, रशिया युक्रेन वाद अशा अनेक भूराजकीय परिस्थितीचा फटका भारतीय बाजारात बसेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय बाजारात दरकपातीची शक्यता नसल्याने पसंदी देतात का युएस बाजाराला ते पसंती देतील ते पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


टॅरिफ किमतीतील अस्थिरता तात्पुरती परिस्थिती असली तरी त्यात संबंधित परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो. परंतु अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अंतिम टॅरिफ पातळीचा विचार सुरू असल्याने अजूनही दराबाबत अस्पष्टता कायम आहे. परिणामी ऑगस्ट पासून वाढीव कर लादण्याचा धोका असल्याने, महागाईचा अंदाज अद्याप अनिश्चित आहे. आजच्या माध्यमातील अहवालात असे दिसून आले आहे की, टॅरिफ दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तज्ञांच्या मते 'कपड्यांच्या किमती वाढल्या आहेत, घरगुती फर्निचरच्या किमती वाढल्या आहेत आणि मनोरंजनाच्या वस्तू वाढल्या आहेत. त्या मोठ्या प्रमाणात आयात केलेल्या वस्तू आहेत आणि वाढ लक्षणीय होती. ऑडिओ-व्हिडिओ उपकरणांच्या किमती महिन्यात १.१% वाढल्या आहेत आणि वर्षानुवर्षे (Year on Year Basis Yo Y) आधारावर ११.१% वाढल्या आहेत.


व्याजदरात कपात न केल्याबद्दल ट्रम्पकडून जवळजवळ दररोज टीका होत असलेल्या फेडसाठी हे सावधगिरीचे पाऊल ठरण्याची शक्यता आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुठे परिणाम होईल हे स्पष्ट होईपर्यंत केंद्रीय बँकर्स हे दरकपातीचे पाऊल उचलण्यास कचरत आहेत. सध्या वाढलेल्या टेरिफमुळे अमेरिकेच्या ट्रेझरी सिक्युरिटीजवरील उत्पन्न सुमारे एका महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आणि व्याजदर फ्युचर्सने सप्टेंबरमध्ये फेड पुन्हा दर कपात सुरू करेल या अनिश्चिततेचे प्रतिबिंब दर्शविले गेले. मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये एका भाषणात, फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ बोस्टनच्या अध्यक्षा सुसान कॉलिन्स यांनी इशारा दिला की,'आयात करांमध्ये वाढ महागाई वाढवेल आणि वाढ आणि रोजगार कमी करेल अशी अपेक्षा आहे. परंतु त्यांनी असेही म्हटले की व्यवसाय आणि घरगुती दोन्ही बाजूंवर मजबूत बॅलन्स शीटमुळे फटका सहन करण्यास आणि त्याचा परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते.'


'कंपन्यांचा नफा मार्जिन कमी करण्याची आणि ग्राहकांना जास्त किंमती असूनही खर्च सुरू ठेवण्याची क्षमता वाढल्याने टॅरिफचा परिणाम काहीसा कमी होऊ शकतो. परिणामी, कामगार बाजार परिस्थिती आणि आर्थिक वाढीवर टॅरिफचा प्रतिकूल परिणाम अधि क मर्यादित असू शकतो,' असेही कॉलिन्स यावेळी म्हणाल्या. याशिवाय, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ठामपणे म्हटले,' ग्राहकांच्या किमती 'कमीच' आहेत आणि फेडने दर कमी करावा यासाठीही त्यांचा अट्टाहास कायम आहे. ट्रम्प यांनी त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा पूर्ण महिना डिसेंबरच्या तुलनेत जूनमध्ये ग्राहकांच्या किमतीची पातळी सुमारे १.२% जास्त होती. यासंबंधीची माहिती देताना प्रसारमाध्यमांना व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की अन्न आणि ऊर्जा किमती वगळ ता कोर चलनवाढ अपेक्षेपेक्षा कमी वाढली आहे हे सिद्ध करते की अध्यक्ष ट्रम्प महागाई स्थिर करत आहेत.' असे म्हटले.


जूनमध्ये कोर चलनवाढ (Core Inflation) २.९% वार्षिक दराने वाढली, जी ३% च्या सहमतीच्या अंदाजापेक्षा थोडी कमी होती, परंतु मे महिन्यापेक्षा थोडी जास्त होती. अन्न आणि ऊर्जा खर्च दोन्ही वाढले, ज्यामुळे हेडलाइन चलनवाढ (Headline Inflation) गेल्या महिन्याच्या २.४% व रून २.७% पर्यंत वाढली.गुंतवणूकदारांना अजूनही सप्टेंबरमध्ये फेड सध्याच्या ४.२५% वरून डिसेंबरपासून कायम असलेल्या ४.५% बेंचमार्क व्याजदरापर्यंत एक चतुर्थांश टक्केवारी कमी करेल अशी अपेक्षा आहे परंतु येत्या २९-३० जुलैच्या बैठकीत कपात हो ण्याची शक्यता आता ५% पेक्षाही कमी आहे असे अमेरिकेन अर्थतज्ज्ञ सातत्याने म्हणत आहेत. टॅरिफ किमतीतील हा धक्का अखेर तात्पुरता, एकदाच होणारा परिणाम ठरू शकतो. परंतु अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अंतिम टॅरिफ पातळीचा विचार सुरू असल्याने तसेच १ ऑगस्टपासून वाढीव कर लादण्याचा धोका असल्याने, महागाईचा अंदाज अजूनही अनिश्चित आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय गुंतवणूकदारांनी देखील डोळ्यांत अंजन घालून गुंतवणूक करण्याची गरज आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Comments
Add Comment

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला