कर्जत : कर्जत तालुक्यातील पोसरी गावाजवळ उल्हास नदीत एका महिलेचा मृतदेह वाहून आला होता. येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास हा मृतदेह आला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कर्जत पोलीस उपस्थित झाले. ही मृत महिला सुमारे ५० वर्ष वयोगटातील आहे. या महिलेची ओळख पटली आहे.
कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले आणि सहकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला.
या महिलेचे नाव विजया अनिल काळोखे असे आहे. ती कर्जत मुद्रे येथील नेमिनाथ सोसायटी येथे राहणारी आहे. कर्जत पोलीस ठाण्यात या महिलेची बेपत्ता असल्याची तक्रार होती दाखल. या महिलेचे पती अनिल काळोखे हे नुकतेच सेवा निवृत्त झाले आहेत.