काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का: संजय जगताप भाजपमध्ये दाखल, पुरंदर हवेलीत राजकीय समीकरणं बदलणार!

पुणे : काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी आज भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सासवड येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आगामी निवडणुकांपूर्वी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण यामुळे पुरंदर हवेलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.


गेल्या काही दिवसांपासून संजय जगताप भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी जगताप यांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली होती, त्यानंतर आज हा पक्षप्रवेश निश्चित झाला.


पक्षप्रवेशानंतर बोलताना संजय जगताप यांनी कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि भाजपची साथ आपल्याला लाभली आहे. "जिथे विकास आहे, तिथे राजकारण नाही. इथे कोणत्याही शेतकऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन विकास होत नाही, इथे विकास होतो. या विचारामुळेच मी भाजपमध्ये आलो आहे," असे त्यांनी नमूद केले. भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपण आज प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.



आज ३ हजार प्रवेश करायचे होते, पण यादी कमी करून ३७८ प्रवेश झाले आहेत, असे जगताप यांनी सांगितले. ते म्हणाले, "फक्त संजय जगताप प्रवेश करत नाहीत, तर प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी प्रवेश करत आहे." त्यांनी आपल्या स्वभावात दोष असल्याचे सांगत आपण कधीच वेळेवर येत नाही, अशी कबुली दिली.


पुरंदर तालुक्यातील पाणीप्रश्न आणि विमानतळाचा मोठा प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. "विमानतळ पुरंदर तालुक्यातच होणार आणि योग्य ठिकाणी होणार, असा मी तुम्हाला शब्द देतो," असे आश्वासन त्यांनी दिले. कोणताही प्रकल्प शेतकऱ्यांच्या डोक्यावर पाय देऊन होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्यांच्या खात्यात पैसे देण्याचे काम केले आहे. सामाजिक समरसतेचे विचार आपल्याला भावले, म्हणूनच आपण पक्षप्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. "एखाद्याला पक्षात घेताना खूप अडचणी येतात, पण तुम्ही मला सामावून घेतले," असे म्हणत त्यांनी आभार मानले.


आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीत आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याची 'पाठ मातीला लागणार नाही', असा विश्वास त्यांनी दिला. "येणाऱ्या काळात आम्ही भाजपचा प्रचार आणि प्रसार करू. जी जबाबदारी द्याल, ती तळमळीने शेवटपर्यंत पार पाडण्याचे काम करेन," असे जगताप म्हणाले. तसेच, "येणाऱ्या काळात मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, पुरंदर हवेलीच्या जनतेला आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक परिवाराला सांगू इच्छितो की, कोणत्याही अन्यायाला आपण ठोसपणे आणि ताकदीने उभे राहण्याचे काम करू. संजय जगताप प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या परिवाराच्या मागे राहील, प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे राहील, विकासाच्या बाबतीत कोणालाही राजकारण करू देणार नाही," असेही त्यांनी म्हटले. मागील दोन वर्षांत 'साडीने आमच्या पुरंदरला गुंडाळून टाकले,' असे म्हणत त्यांनी नाव न घेता विजय शिवतारे यांना टोला लगावला.

Comments
Add Comment

मराठा आरक्षण - मृतांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत

मुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरीता ज्यांनी आत्महत्या केली किंवा आंदोलना दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला. अशा

Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व

मोठी भरती! महाराष्ट्रात अनुकंपा आधारावर होणार मेगा भरती!, १०,००० रिक्त पदे भरली जाणार

दिवाळीपूर्वी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मुंबई: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून

Pune Crime: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं समोर

पुणे: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत आयुष (गोविंदा) गणेश

राज्याचा परकीय गुंतवणुकीचा आलेख घसरला

कर्नाटकचा पहिला नंबर, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी मुंबई : परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात नेहमीच

"महाराष्ट्राच्या मानगुटीवर पवारांनी जरांगे नावाचं भूत बसवलं", बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण,

बारामती: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न तापत असताना ओबीसी समाजात नाराजीचे वातावरण आहे. सरकारने मनोज जरांगे