मॉर्निंग वॉक किंवा व्यायामानंतर पाणी पिताना 'ही' घ्या काळजी, अन्यथा...

अनेक लोकांना याची माहिती नसते की मॉर्निंग वॉक किंवा कोणताही व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे. बऱ्याचदा घाम आल्याने आणि शरीराचे तापमान वाढल्याने लगेच तहान लागते आणि लोक कोणताही विचार न करता घटाघट पाणी पितात. पण, तज्ज्ञांच्या मते, व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिणे हानिकारक ठरू शकते.


व्यायामानंतर लगेच पाणी का पिऊ नये?


जेव्हा आपण चालतो किंवा कोणताही व्यायाम करतो, तेव्हा आपल्या शरीराचे तापमान वाढते आणि घाम येऊ लागतो. या काळात रक्ताभिसरण वाढते आणि शरीराला सामान्य तापमानावर येण्यासाठी थोडा वेळ लागतो. अशा स्थितीत लगेच पाणी प्यायल्यास खालील अडचणी येऊ शकतात.


सर्दी किंवा खोकला: वाढलेल्या शरीराच्या तापमानात अचानक थंड पाणी प्यायल्याने शरीर एकदम थंड होऊन सर्दी किंवा खोकला होऊ शकतो.


पोटात दुखणे: प्रचंड तहान लागलेली असताना अचानक जास्त पाणी प्यायल्यास पोटात दुखू शकते किंवा चमक मारू शकते.


पचनावर परिणाम: लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावू शकते, ज्यामुळे अपचन होऊ शकते.


वॉक किंवा व्यायामानंतर किती वेळाने पाणी प्यावे?


तज्ज्ञांच्या माहितीनुसार, चालणे थांबवल्यानंतर किमान २० ते ३० मिनिटांनी पाणी प्यावे. या काळात तुम्ही काही वेळ बसून हलके स्ट्रेचिंग करून शरीराला 'कूल डाऊन' करू शकता. जेव्हा तुमच्या हृदयाचे ठोके (पल्स रेट) सामान्य होतील आणि घाम येणे बंद होईल, तेव्हा पाणी पिणे योग्य राहील.


या टिप्स फॉलो करा:


हळूहळू प्या: एकाच वेळी जास्त पाणी पिण्याऐवजी हळू हळू एक-एक घोट पाणी प्या.


रूम टेंपरेचरचे पाणी: थंड पाणी पिण्याऐवजी हलके कोमट पाणी पिणे नेहमीच चांगले.


हायड्रेटेड रहा: केवळ चालतानाच नव्हे, तर संपूर्ण दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवा. खूप घाम येत असेल, तर साध्या पाण्याऐवजी नारळ पाणी किंवा लिंबू पाणी पिऊ शकता.


योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाणी प्यायल्याने शरीर लवकर रिकव्हर होण्यास मदत होते आणि त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. त्यामुळे यापुढे वॉक किंवा व्यायाम करताना तहान लागल्यास थोडे थांबा, रिलॅक्स व्हा आणि मग सावकाश पाणी प्या.



(टीप : वरील सर्व बाबी प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. या लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी प्रहार घेत नाही आणि कोणताही दावा करत नाही.)

Comments
Add Comment

'World Smile Day'- "जागतिक स्मित हास्य दिवस"...

"जागतिक स्मित हास्य दिवस" का साजरा केला जातो ? हे सविस्तर जाणून घ्या धकाधकीमुळे अनेकजण प्रचंड त्रासले असतात.

WORLD SMILE DAY : स्मितहास्य आरोग्याची गुरुकिल्ली

हसताय ना, हसायलाच पाहिजे... म्हणणारा निलेश साबळे असो कि महाराष्ट्राची हास्यजत्रा मधले कलाकार... आपल्या तणावपूर्ण

एकाग्रता वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स !

मुंबई : आजचा काळ म्हणजे वेगवान जीवनशैली आणि सततची स्पर्धा. या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण

पारंपरिकतेला फॅशनचा ट्विस्ट

दिवस सणांचे भरपूर शॉपिंगचे ... दिवाळी अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली आहे. नवरात्र संपत आलीय आणि दिवाळीच्या तयारीची

जागतिक शाकाहारी दिन

आज १ ऑक्टोबर. जागतिक शाकाहार दिन. जगभर आजच्या दिवशी शाकाहार दिन साजरा करतात. शाकाहारी लोकं काय खाऊन प्रोटिन्स

'व्हिटॅमिन डी'ची कमतरता, किशोरवयीन मुलांमध्ये अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका

मुंबई : भारतातील किशोरवयीन मुलानंमध्ये 'व्हिटॅमिन डी' आणि 'झिंक'ची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसते. या कमतरतेमुळे