परेल टी.टी. पुलावरील वाहतूक आता होणार सुरळीत

आता डांबराऐवजी सिमेंट काँक्रीटचा वापर


मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील मडकेबुवा चौकातून जाणारा अर्थात परेल टी टीचा पूल म्हणून प्रसिध्द असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराज उड्डाणपूलाची आता डागडुजी केली जाणार आहे. तसेच या पुलावर वारंवार खड्डे पडत असल्याने या पुलाचा पृष्ठभाग आता सिमेंट काँक्रिटचा केला जाणार आहे. या पुलावरील खड्डयांची समस्या कायमच निकालात निघाली जाण्याची शक्यता आहे.


परेलच्या पूर्व बाजुस असलेल्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील मडकेबुवा चौकातून जाणारा परेल टी.टी. म्हणजेच संत शिरोमणी श्री. नामदेव महाराज उड्डाणपुल हे सन १९८९ मध्ये बांधण्यात आले. या पुलाची उभारणी तत्कालिन तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आली. परंतु या पुलाचे बांधकाम करताना रचना केलेले प्रसरण साधे आणि त्याच्या पृष्ठभागातील डांबराचा वापर केला जात असल्याने पावसाळ्यात खड्डे पडण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. त्यामुळे या पुलाच्या डागडुजीचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे.


महापालिका पूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परेल टी टी पुलाच्या बांधकामामध्ये एकूण २२ प्रसरण सांधे आहेत. पुलाच्या पृष्ठभागावरील रस्त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे. तसेच, जास्त प्रसरण सांधे हे वाहतुकीसाठी गैरसोईचे आहेत.


यावर उपाय म्हणून डेक कन्टीन्युटी ३ ते ४ प्रांतर आणि पुलावरील पष्ठभागावर १०० मि.मी.चा प्रचलित कॉक्रीटचा थर देण्यात येणार आहे. जेणेकरुन रायडींग क्वॉलिटी मिळू शकेल. याच प्रमाणे या पुलाचे बेअरिंग बदलणे आवश्यक आहेत. तसेच या काम करतांना पुलाचे गर्डर व पिअर यांना सीएफआरपीद्वारे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या पुलाची सुधारणा तथा दुरुस्ती करण्यात येणार आहे.


यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये गुजरातमधील रिबिल्ड स्ट्रक्ट असोसिएटस ही कंपनी पात्र ठरली आहे. या गुजरामधील कंपनीला हे काम देण्यात आले असून यासाठी विविध करांसह १७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे या कंपनीचे स्वतः च्या मालकीचे साहित्य आणि यंत्रे आहेत तसेच सद्यस्थितीत त्यांच्याकडे कमी कामे असल्याने त्यांचे बरेच कामगार कामाशिवाय आहेत म्हणून ते कमी दरामध्ये काम करण्यास उत्सुक आहेत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.

३,१९० कोटींचे मालक अमिताभ बच्चन; पण संपत्तीचा वारस कोण? कोणाला किती मिळणार?

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे केवळ अभिनयाचेच नव्हे तर प्रचंड संपत्तीचेही बादशाह आहेत.

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, एकाला केले अटक

मुंबई : आज सर्वत्र अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) ची धामधूम असताना, मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर

लालबागचा राजाच्या मिरवणुकीपूर्वी दुर्दैवी घटना, मुख्य प्रवेशद्वारावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू

मुंबई: गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच