कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, खासदार नारायण राणे यांचा इशारा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या सर्व रस्त्त्यांची डागडुजी व दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करा. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.


खासदार नारायण राणे यावेळी म्हणाले की, पावसाळ्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे पडल्याने लोकांना वाहन चालवताना खूप त्रास होतो आहे. अनेक ठिकाणी खड्यांमुळे अपघात होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची तत्काळ दुरुस्तीची गरज आहे. दुरुस्तीचे काम मानकानुसार (नॉम्र्स) होईल याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील अनेक साकव नादुरुस्त झालेले आहेत. हे साकव देखील प्राधान्याने दुरुस्ती करावेत, जेणेकरून नागरिक आणि विद्याध्यांची गैरसोय होणार नाही. साकांबाबत नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, असे काम करा. नवीन साकव बांधत असताना त्याची गुणवत्ता तपासून ते उत्कृष्ट असतील, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश खा. नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.



मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरा; 'त्या' ठेकेदाराला नोटीस काढा


गणेशोत्सव सण जवळ आला आहे. महामार्ग व त्यावरील खड्डे तातडीने कसे भरता येतील व महामार्ग सुस्थितीत ठेवता येईल याचे नियोजन करावे. जो ठेकेदार याला जबाबदार आहे, त्याला नोटीस काढा. निकृष्ट दर्जाचे हे काम झाले असून त्यावावत ठेकेदाराला जवाबदार धरा, असे आदेश खासदार नारायण राणे यांनी या बैठकीत दिले. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे अपघातामुळे बळी व जखमीची सख्या वाढत आहे. यावायत खासदार राणे यांनी गंभीर दखल घेतली. त्या ठेकेदाराला तातडीने नोटीस काढा. खड्डे भरून सुस्थितीत मार्ग करा, असे आदेश त्यांनी दिले. या महामार्गावर पडलेल्या खड्डयांकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून वाहनांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या महामार्गावर पाणी साचल्याने खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे हा महामार्ग धोकादायक बनला आहे.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या