निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) बाजारातील मजबूत फंडामेंटलमुळे आंतरराष्ट्रीय दबाव नियंत्रित ठेवण्यास मदत झाली आहे. कारण आज सकाळच्या सुरुवातीच्या कलात बहुतांश श्रेत्रीय निर्देशांकात वाढ झाली. सर्वाधिक वाढ मिडिया (०.९१%,ऑटो (०.४४%),रिअल्टी (०.३७%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.६३%) समभागात वाढ झाली आहे. घसरण मात्र आयटी (०.०३%), मेटल (०.३९%), फार्मा (०.०१%) समभागात कायम आहे.
आज निफ्टीतील अस्थिरता निर्देशांकात ०.५८% घसरण झाल्याने संध्याकाळपर्यंत समभागातील चढउतार राहू शकते असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
अमेरिकेने अव्वाच्या सव्वा टेरिफचे आयात दर लावून जगातील अनेक राष्ट्रांना त्रस्त केले असतानाच आणखी एक टेरिफ बॉम्ब डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला आहे. 'जर रशियाने युक्रेनविरोधात युद्धविराम केला नाही तर आम्ही रशियावर १००% टेरिफ लावू असे म्हटले आहे. मात्र रशियाला ५० दिवसांचा मुदत अवधी जाहीर केल्यानंतर त्याचा फायदा युएस व जागतिक बाजारपेठेत काही प्रमाणात दिसला. युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रे पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युरोपियन युनियन, कॅनडा, मेक्सिको यांच्यावर ३०% ते ३५% टेरिफ लावल्याने जागतिक अर्थव्यवस्थेचे गणित बदलत आहे. बाजारातील अस्थिरता पातळी आणखी एक वाढत चढउताराचे प्रश्नचिन्ह कायम आहे. भारताबद्दलही ट्रम्प यांनी विधान करत म्हटले, भारत पाकिस्तान युद्ध परिस्थिती डील होऊ शकत नाही. त्यामुळे आपापसातील वाद मिटवा. त्याशिवाय टेरिफचा प्रश्न मिटणार नाही. त्यांनी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर स्तुती करत 'मी मध्यस्थी केल्याने भारत पाकिस्तान अण्वस्त्रे युद्ध टाळणे शक्य झाली' असा यानिमित्ताने पुनरुच्चार केला. यामुळे बाजारातील संकेतात निर्देशांकात तरी घसरणीचेच संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे चीनही लवकरच आपले सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product GDP) आकडेवारी जाहीर करणार आहे ज्यामध्ये सरकारच्या अपेक्षेपेक्षा थोडी अधिक सकारात्मक आकडेवारी येऊ शकते असे तज्ञांनी सोमवारी आपले मत व्यक्त केले होते. दुसरीकडे आज अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल असून सेन्सेक्समध्ये विकली एक्सपायरी होणार असल्याने बाजारात अस्थिरता कायम राहू शकते.
अमेरिकेन बाजारात काल संमिश्र प्रतिसाद गुंतवणूकदारांनी दर्शविला होता. युएस बाजारातील निर्देशांकात डाऊ जोन्स (०.०३%) घसरले असून एस अँड पी ५०० (०.१४%), नासडाक (०.२७%) वाढ झाली आहे. आशियाई बाजारात कोसपी (०.२०%) व सेट कंपोझिट (०.०५%), शांघाई कंपोझिट (०.३०%) वगळता इतर बाजारात वाढ झाली होती.
काल सोन्याच्या दरात सलग चौथ्यांदा वाढ झाली होती. आज भल्या पहाटे सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.०४% घसरण झाली आहे. गेले काही सोन्यात सातत्याने आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याने ही दरवाढ होत आहे. विशेषतः चांदीतही मोठी वाढ सातत्याने होत आहे. पुरवठ्यापेक्षा औद्योगिक मागणीत वाढ झाल्याने तसेच पर्यायी गुंतवणूक म्हणून सोन्याचांदीत यापूर्वी नफा बुकिंग झाल्याने पातळी वाढली. कच्च्या तेलाच्या निर्देशांकात सकाळपर्यंत घसरण झाल्याने कच्च्या तेलाचे दर आज घसरू शकतात. प्रामुख्याने रशियन वस्तू खरेदी करतील त्यादेशावर भलामोठा कर लावण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले होते. मात्र नुकत्याच जाहीर केल्याप्रमाणे रशियाला युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने ५० दिवसांची मुदत जाहीर केली आहे अथवा न थांबल्यास अमेरिका रशियावर १००% कर लावेल असे म्हटले होते. मात्र तात्पुरता दिलासा मिळाल्याने कच्चे तेल घसरले आहे.
आज सकाळी जागतिक अनिश्चितेचे फटका भारतीय रूपयाला दिसत आहे. मागील महिन्यात डॉलरला आपले मूल्य राखण्यास मदत झाली असली तरी टेरिफ घोषणांच्या पार्श्वभूमीवर डॉलर पुन्हा सातत्याने वधारत आहे. आजही घसरण कायम राहिली ज्याचा फटका भारतीय शेअर बाजारातही जाणवू शकतो. एकूणच भारतीय बाजारात मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये होणारी हालचाल वगळता विशेषतः तिमाही निकाल जाहीर होताना ब्लू चिप्स शेअर्स, आयटी, फार्मास्युटिकल, फायनांशियल सर्व्हिसेस, बँक निर्देशांक यांच्यातील हालचाल पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळच्या सुरुवातीच्या कलात सर्वाधिक वाढ जिलेट इंडिया (४.७८%), पिरामल एंटरप्राईज (४.१%),ओला इलेक्ट्रिक (३.५७%), टाटा टेक्नॉलॉजी (३.०७%),अंबर एंटरप्राईजेस (३.०१%), आरसीएफ (२.८३%), हिमाद्री स्पेशल (२.२५%), एचपीसीएल (२.३१%), गार्डन रीच (२.३३%), ओबेरॉय रिअल्टी (२.०२%), सीटी युनियन बँक (१.६६%), हिरो (१.६५%), झी एंटरटेनमेंट (१.६५%), अदानी ग्रीन (१.४१%), क्रिसील (१.६१%), आय आय एफ एल फायनान्स (१.२१%) समभागात वाढ झाली आहे.
सर्वाधिक घसरण जेपी पॉवर (६.५४%), तेजस नेटवर्क (५.३७%), एसईएमई सोलार (२.४१%), एनएमडीसी (१.५९%), सिमेन्स (०.८४%), टाटा स्टील (१.०२%), जे एम फायनांशियल (०.८३%), इन्फोऐज (०.८९%), सिप्ला (०.५१%), विशाल मेगामार्ट (०.०९%) समभागात झाली. एकूणच आजच्या बाजारातील परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांना सावधतेचा इशारा दिला जात आहे.