यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढताना ईव्हीचा पायाभूत सुविधा वाढतील. जगभरातेल सर्वात प्रसिद्ध वाय मॉडेल आणल्याने मी टेस्लाचे आभार मानतो. महाराष्ट्र सरकार संपूर्णतः ईव्ही कारच्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. सरकारने वेळोवेळी यासंबंधी योजना केल्या व पाठबळ दिले.' भारतातील आगळ्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गाडीचे उद्घाटन झाल्याने भारताचा विजयी पताका जगभरात रोवला गेला. उद्योगपती एलोन मस्क संचलित टेस्ला अखेर सगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे टेस्लाने भारतातील पहिले शोरूम मुंबईत उघडण्याला पसंती दिली. कंपनीकडून विविध पाच प्रकारची मॉडेल येणार असे सांगितले जात आहे. अशातच त्यातील सर्वाधिक लोकप्रिय व बहुप्रति क्षित 'वाय' मॉडेल भारतात लाँच केले जाणार आहे.'
याशिवाय बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,' मुंबई व महाराष्ट्रात आम्ही टेस्लाचे स्वागत करतो. त्यांनी योग्य शहर निवडले आहे. टेस्लाने भारतात केवळ शोरूम नाही तर लॉजिस्टिकस व सर्विसिंगसाठी भारतात येत आहेत. चार चार्जिंग स्टेशन ते स्थापन करणार आहेत. आम्ही अत्यंत आनंदी आहोत की ते भारतात येत आहेत महाराष्ट्र इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी दिशादर्शक अग्रेसर राज्य आहे. जेव्हा ते उत्पादनही भारतात सुरू करतील तेव्हा ते नक्कीच महाराष्ट्राचा विचार करतील अशी आशा करतो.' असे म्हटले. दरम्यान टेस्लाने यापूर्वी उत्पादन सध्या भारतात करणार नसल्याचे म्हटले होते. मात्र त्यांनी इतर रसद पुरवठा करुन भारतात ईव्ही इको सिस्टीम मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मार्केट मेक्सटी (Market Mexcity) येथे स्थित ४००० स्क्वेअर फूट असलेले हे शोरूम मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बिझनेस हब म्हणून ओळख असलेल्या बीकेसीमध्ये उघडले गेले. कंपनीने ही जागा भाड्याने घेतली असून ३५ लाख रूपये इतके भाडे कंपनी भरणार आहे. सगळ्या गाड्या ईव्ही (Electric Vechile EV) प्रकारच्या असून नुकतेच मॉडेल वाय (Model Y) चे आगमन भारतात झाले. सगळ्या गाड्यांचे उत्पादन शांघाई चीन येथे होणार आहे. ६० लाख रूपयांपासून पुढे सुरूवात इतकी या कारची किंमत सांगितली जात आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करत काही दिवसांपूर्वीच कंपनी शोरूम मुंबईत उघडणार असल्याची पुष्टी दिली होती. आज त्याला मूर्त स्वरूप मिळाले आहे.
केवळ गाडी नाही तर चार्जिंगसेवा, इतर संबंधित एक्सेसरी सपोर्ट व विक्रीनंतरचा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी टेस्लाने सुपरचार्जर स्टेशन्स देखील आयात केले आहेत, ज्यांच्याशी संबंधित अक्सेसरीज आहेत, ज्यांची किंमत सुमारे १ दशलक्ष डॉलर्सची गुंत वणूक केली जाईल (सुमारे ८.५ कोटी रुपये) आहे. भारतीय बाजारपेठेत वाढत्या टेस्ला ग्राहकांच्या आधाराला पाठिंबा देण्यासाठी हे मुंबई आसपासच हे स्टेशन स्थापित केले जाण्याची शक्यता आहे.
यावेळी फडणवीस यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी महाराष्ट्राच्या धोरणात्मक परिसंस्थेवर प्रकाश टाकला ज्यामध्ये देशातील काही सर्वात आकर्षक ईव्ही उत्पादनासाठी गुंतवणूक, चार्जिंग पायाभूत सुविधा विकास आणि संशोधन आणि विकास यांचा समावेश आहे. 'आमच्याकडे सर्वात प्रगतीशील ईव्ही धोरणे आहेत आणि जागतिक उत्पादक ज्या प्रकारच्या परिसंस्थेची अपेक्षा करतात त्यासह आम्ही टेस्लाला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत.' असेही ते पुढे म्हणाले आहेत.
उद्योग विश्लेषकांना वाटते की टेस्लाची भारताची रणनीती टप्प्याटप्प्याने विकसित होत आहे. आयातीपासून सुरुवात करून, स्थानिक असेंब्लीकडे जाणे आणि शेवटी पूर्ण उत्पादन आणि निर्यात (Logisitcs Support) यासगळ्या प्रक्रियांचाही यात समावेश मान ला जातो.सरकारने भारतातील सेमीकंडक्टर, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, उत्पादनक्षेत्र (Manufacturing Sector) यात गुंतवणूक वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते ज्यात पीएलआय (Production Linked Incentive PLI) योजनेचा भाग होता. आता टेस्लाने यो ग्य वेळेत भारतीय बाजारात प्रवेश घेतल्याने यातील ईव्ही सेगमेंटमधील स्पर्धा आणखी मोठ्या प्रमाणात वाढू शकते.