मुंबईकरांसाठी 'गोड' बातमी: गेटवे ऑफ इंडिया येथील 'रेडिओ जेट्टी'ला हायकोर्टाची मंजुरी

काही अटींसह सर्व याचिका फेटाळल्या


मुंबई : मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात प्रस्तावित रेडिओ क्लब जेटी प्रकल्पास मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा झेंडा दिला आहे. या संदर्भातील सर्व तीन याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या असून, प्रकल्प राबवताना काही महत्त्वाच्या अटींचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.


प्रकल्पाचा उद्देश प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा असून, त्यासोबतच्या इतर सुविधा केवळ पूरक असाव्यात व पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याचा आदेशही दिला आहे. न्यायालयाने नमूद केले की प्रकल्पाचा मुख्य हेतू प्रवाशांच्या चढउतारासाठी सुविधा उपलब्ध करून देणे हा असून, इतर घटक त्यास पूरक असावेत. ऍम्फीथिएटर प्रवाशांसाठी प्रतीक्षा क्षेत्र म्हणून वापरले जाईल. कोणतेही सांस्कृतिक, मनोरंजनात्मक किंवा व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. कॅफे, रेस्टॉरंट हे पाणी व पॅकबंद अन्नपदार्थ पुरवण्यासाठी असावे. पूर्णपणे जेवणाची सुविधा देणे प्रतिबंधित असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, विद्यमान जेट्यांचे टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे काम भारतीय नौसेनेच्या मार्गदर्शनानुसार करण्याचे निर्देश दिले आहेत.


न्यायालयाने ही बाबही अधोरेखित केली की, या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी कोणतीही यंत्रणा प्रस्तावित नाही. त्यामुळे कोणताही उपक्रम पर्यावरणासाठी अपायकारक ठरू नये, याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डवर असेल. तथापि, न्यायालयाने दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे स्पष्टपणे बजावले आहे.



मुख्यमंत्र्यांसह सर्वांचे सहकार्य, वेगाने काम पूर्ण करणार!


या प्रकल्पासाठी वाहतूक कोंडी अहवाल, हेरिटेज समितीचा अहवाल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परवानग्यांसह अन्य सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि स्थानिक आमदार व विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संपूर्ण प्रक्रियेत मोठे सहकार्य केल्याचे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, आता रेडिओ जेट्टीचे काम वेगाने पूर्ण केले जाईल असे आश्वासन देत मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाबद्दल उच्च न्यायालयाचे आभार मानले. मुंबईकरांसाठी, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि भविष्यात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ही रेडिओ क्लब जेट्टी अत्यंत महत्त्वाची आहे. या जेट्टीमुळे मुंबईकरांचे आयुष्य सुखकर होईल. आता जो नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधत आहोत, तिथे रेडिओ जेट्टीवरून केवळ ४० मिनिटांत पोहोचता येईल, अशा पद्धतीचा मार्ग तयार करण्याचा आमचा मानस असल्याचे राणे यांनी सांगितले.



मुंबईकरांना मोठा दिलासा: ४० मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट!


नितेश राणे यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "मुंबईकरांसाठी, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि भविष्यात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ही रेडिओ क्लब जेट्टी अत्यंत महत्त्वाची आहे."


या जेट्टीमुळे मुंबईकरांचे आयुष्य सुखकर होईल. आता जो नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधत आहोत, तिथे रेडिओ जेट्टीवरून केवळ ४० मिनिटांत पोहोचता येईल, अशा पद्धतीचा मार्ग तयार करण्याचा आमचा मानस असल्याचे राणे यांनी सांगितले.



मुख्यमंत्र्यांसह सर्वांचे सहकार्य, वेगाने काम पूर्ण करणार!


या प्रकल्पासाठी वाहतूक कोंडी अहवाल (Traffic Congestion Report), हेरिटेज समितीचा अहवाल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परवानग्यांसह अन्य सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेअजित पवार आणि स्थानिक आमदार व विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संपूर्ण प्रक्रियेत मोठे सहकार्य केल्याचे राणे यांनी नमूद केले.


उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, आता रेडिओ जेट्टीचे काम वेगाने पूर्ण केले जाईल, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले आणि या निर्णयाबद्दल उच्च न्यायालयाचे आभार मानले.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : भाजप-शिवसेना वरळीतून फुंकणार प्रचाराचे रणशिंग! ३ जानेवारीला भव्य सभा

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीची तोफ धडाडणार मुंबई : जागावाटप आणि बंडखोरांची मनधरणी करून झाल्यानंतर,

Navnath Ban : संजय राऊत म्हणजे ‘पोपटलाल’, त्यांना मुंबईत ‘खान’ महापौर करायचा आहे; भाजप नेते नवनाथ बन यांचा टोला

“पत्राचाळीत मराठी माणसाला कुणी देशोधडीला लावलं?” मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो बँक बॅलेन्स तपासा! खात्यात नेमके किती हप्ते जमा झाले? पहा सरकारची नवीन वर्षाची भेट

मुंबई : राज्यभरातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी संमिश्र

Nitesh Rane : मुंबईचा महापौर हा केवळ मराठी आणि हिंदूच होणार; मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना डिवचले

'बुरखेवाली' महापौर होण्याची भीती वाटत नाही का? मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईत पाऊसच आगमन

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने मुंबईकरांना आनंदाचा सुखत धक्का बसला आहे. वाढत्या

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इक्बाल सिंग चहल मुख्य निरीक्षक

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला