'मुलगा सुखरूप पृथ्वीवर परतला, आता काही भीती नाही!" शुभांशू शुक्लाच्या आईवडिलांनी दिली भावनिक प्रतिक्रिया, पंतप्रधानांनीही केले अभिनंदन

नवी दिल्ली: अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेतून यशस्वीरित्या परतल्यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लाच्या कुटुंबामध्ये आनंदाची लाट पसरली आहे. "मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण होऊन मुलगा सुखरूप परतला, आता कोणतीही भीती नाही" असे भावोद्गार शुभांशु शुक्ला यांच्या आईने काढले. तर त्यांच्या वडिलांनीदेखील आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींनी देखील शुभांशु शुक्ला यांचे अभिनंदन करत त्यांना अब्जावधी स्वप्नांचा प्रेरणास्थान म्हटले.


१८ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज मंगळवारी पृथ्वीवर सुरक्षितपणे परतले. त्यांच्या या ऐतिहासिक मोहिमेनंतर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. या खास प्रसंगी शुभांशूची आई आशा शुक्ला यांनी आनंदाश्रूसोबत आपला आनंद व्यक्त केला.


"मुलगा खूप मोठे मिशन पूर्ण करून परतला आहे. तो कसा गेला आणि कसा परत आला हे पाहणेच खूप मोठी गोष्ट होती. मी सतत देवाला प्रार्थना करत होती की लँडिंग सुरक्षित व्हावे. आता सर्व भीती संपली आहे आणि मी पूर्णपणे निश्चिंत झाले आहे" अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या,


शुभांशूचे वडील शंभू दयाळ शुक्ला यांनीही आनंद व्यक्त करताना सांगितले की "या मोहिमेसाठी आमच्या मुलाला प्रोत्साहन आणि भरभरून आशीर्वाद देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभार मानतो." शुभांशूच्या कुटुंबाने केक कापत त्यांच्या परतीचा आनंद साजरा केला.



पंतप्रधान मोदींनी केले शुभांशू शुक्ला यांचे अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या खास प्रसंगी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे अभिनंदन केले. "आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून शुभांशू शुक्ला यांनी धैर्य आणि समर्पण भावनेने अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली आहे. आपल्या स्वतःच्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने हा आणखी एक मैलाचा दगड आहे - गगनयान, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर एक पोस्ट करत शुभांशूचे स्वागत केले.

Comments
Add Comment

आधार कार्ड संदर्भात ५ नवीन नियम लागू! तुमचे कार्ड लगेच तपासा

१० वर्षांवरील आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य; वडिल-पतीचे नाव हटवले, 'बायोमेट्रिक' अपडेटसाठी शुल्क वाढले मुंबई:

चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना; ९ कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईजवळील उत्तर चेन्नई औष्णिक वीज केंद्राच्या बांधकाम ठिकाणी आज एक भीषण

'ड्रायव्हरलेस' रिक्षा भारतात दाखल! या रिक्षाची किंमत किती आणि कुठे चालणार ही रिक्षा, पहा..

मुंबई: भारतीय वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकत ओमेगा सेकी मोबिलिटीने (OSM) जगातील पहिली चालकरहित

भारतामधून कोणत्या शेजारील देशांमध्ये रेल्वे धावते? प्रवासासाठी 'हे' पुरावे आवश्यक

नवी दिल्ली: भारतामधून काही शेजारील देशांमध्ये रेल्वेने प्रवास करणे शक्य आहे, ज्यामुळे ग्रामीण सौंदर्याचा

VK Karur Stampede : विजय थलापतीला अटक होणार? करूर चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीके जिल्हा सचिवांना बेड्या; पोलिसांची मोठी कारवाई

करूर : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापती एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'अमेरिकेच्या दबावापोटी यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली'

नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या मोठ्या प्रमाणात