संगीत नाटकासाठी रवींद्र नाट्य मंदिर २५% सवलतीत

सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा


मुंबई: संगीत नाटकासाठी २५% सवलतीच्या दरात रवींद्र नाट्यगृह उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केली.

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या "कोहम् सोहम्" या पुस्तकाचे प्रकाशन आज रवींद्र नाट्य मंदिरच्या लघुनाट्य गृहात सांस्कृतिक मंत्री एँड आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, गायक अजित कडकडे, दिनेश पिळगावकर, रामदास भटकळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री एँड आशिष शेलार यांनी अरविंद पिळगावकर यांच्या जीवन कार्यावर आधारीत या पुस्तकावर भाष्य करताना हे सांगितले की, हे पुस्तक संगीत रंगभूमीचा, शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीत परंपरेचा एक मोठा इतिहास उलघडणारे जसे आहे तसेच ते मुंबईच्या सांस्कृतिक घडामोडींच्या नोंदी ठेवणारे आहे. त्यामुळे हे तरुणांनी वाचावे असा संदर्भ कोश आहे. तर संगीत नाटकांसाठी एक योजनाही या निमित्ताने मंत्री शेलार यांनी जाहीर केली. संगीत नाटकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने रवींद्र नाट्यमंदिर सवलतीत देण्याण्याचा निर्णय घेतला असून शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस रवींद्र नाट्य गृहाची २४ सत्र, लघू नाट्यगृहाची १२ सत्र सकाळी ९.३० ते दुपारी २.00 या कालावधीत २५ टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येतील अशी घोषणा मंत्री शेलार यांनी केली.
Comments
Add Comment

'हि-मॅन'ला शेवटचे पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता; नवीन वर्षाची सुरुवातच होणार देशभक्तीने

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र बॉलिवूडचा हि-मॅन कायमच आपल्या

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची