'देवमाणूस' मालिकेत नेमकं चाललंय तरी काय?

  79

लालीचं स्वप्न पूर्ण होणार; गोपाळशी बांधली जाणार लग्नगाठ!


मुंबई : झी मराठीवरील थरारक मालिका 'देवमाणूस- मधला अध्याय' प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे. दर आठवड्यला मालिकेत काही ना काही रोमांचक गोष्टी घडत आहेत. प्रेम, स्वार्थ, गुन्हा आणि कौटुंबिक संघर्ष यांचा अफलातून संगम असलेली ही मालिका रोजच्या भागांमधून उलगडत जाणारी रहस्यं, उत्कंठावर्धक वळणं आणि पात्रांमधील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. सध्या मालिकेत लाली-गोपाळच लग्न आहे. यात एकाचवेळी अनेक मोठे प्रसंग घडणार आहेत जे संपूर्ण कथेला नवं वळण देणार आहेत.


एकीकडे संपत्तीच्या वाटपावरून सुधाकर आणि अजीत यांच्यात जोरदार वाद उफाळतो. अजीतला इतक्या सहज जमीन मिळाल्याचं पाहून सुधाकर चिडतो आणि त्यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण होतं. याच काळात पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या विधी सुरु होतात. लालीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. पण हा आनंद किती काळ टिकणार हे कोणीच सांगू शकत नाही.



दुसरीकडे, अजीत एक धक्कादायक पाऊल उचलतो. लग्न आटपल्यावर गोंधळाच्या आदल्या रात्री मनीषाच्या मदतीने तो मॅकला गुपचूप गाडतो. रात्रभर मेहनत करून पहाटेपर्यंत तो हे प्रकरण हातावेगळं करतो आणि वेळेवर गोंधळासाठी घरीही पोहोचतो. पण अजीतच्या या वागणुकीवर संशयाची छाया लवकरच पडणार आहे.


सोनम म्हसवेकर म्हणजेच लालीने लग्नाच्या सीन बद्दल बोलताना सांगितलं "आमच्या वाड्यापुढेच फार सुंदर मंडप उभा केला गेलाय. मेहंदी, घाणा भरणी, चुडा भरण्याचा कार्यक्रम, हळद, लग्न, हे सर्व तिथेच शूट झालं आणि इतकच नाही तर अजून गृहप्रवेश, गोंधळ शूट बाकी आहे. हळदीमध्ये बैंड वाजला तेव्हा मला माझ्या बालपणीची आठवण आली. आगरी समाजामध्ये मी लहानाची मोठी झाले. तिथे हळदीला असाच बैंड आणि अशीच गाणी वाजवली जातात.


पूर्ण पारंपरिक पद्धतीने, रीतिरिवाजाने गोपाळ -लालीच लग्न शूट होतंय. रोज मला नवरी म्हणून छान लुक मध्ये तयार केलं जातंय. खरं सांगू तर मला ह्या पारंपरिक पद्धती, रीती, गाणी ह्याचं फार कुतूहल आहे.


मला मालिकेतली लग्न फार आवडतात. तब्बल ८ ते १० दिवस माझं लग्न शूट होतंय. संपूर्ण युनिटचा उत्साह पाहून शूट करायला अजूनच मजा येते आहे.


मला एक किस्सा सांगायला आवडेल इथे, आम्ही एक लग्नाचा रील विडिओ शूट केला ‘नवरी नटली' गाण्यावर जो तुम्ही सर्वानी पहिली असेलच, तो विडिओ शूट करण्यासाठी जी आमची मेहनत गेली आहे, कारण सर्वजण एकत्र मिळणं मुश्किल होत. पूर्ण दिवस निघून गेला आणि मध्यरात्री आम्ही ती रील शूट केली, जेव्हा किरण म्हणजेच गोपाळचा एक क्लोज सीन लागला होता आणि त्यांनी दिग्दर्शक सराना विनंती केली आम्हाला ती रील शूट करायला वेळ देण्यासाठी, सरांनी आम्हाला थोडा वेळ दिला आणि सर आम्हाला तो विडिओ शूट करताना पाहून खूप हसत होते."


या सर्व घडामोडींमुळे मालिकेमध्ये एक नवा थरारक टप्पा सुरू होणार आहे. अजीतचा गुन्हा उघडकीस येणार का? मनीषा खरं सांगणार का? गोपाल आणि लालीचं सुखाचं आयुष्य सुरू होणार की त्यातही अडथळे येणार? की अजूनही एक नवं रहस्य समोर येणार. या सर्व प्रश्नांची उत्तर येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहेत.

Comments
Add Comment

Parineeti Chopra Pregnancy News : गुडन्यूज!"आमचं छोटं युनिव्हर्स येतंय", चड्ढा कुटुंबात लवकरच छोटं पाहुणं...परिणीतीच्या पोस्टने इंस्टाग्राम हँग

बॉलीवूडमधील चर्चेत असलेल्या पॉवर कपलपैकी एक, अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आमदार राघव चड्ढा यांनी अखेर

महाराष्ट्रीय भाऊ'ची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री, सलमान खानने केली खास मराठमोळा 'पाहुणचार'

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन, ज्याला 'महाराष्ट्रीय भाऊ' म्हणून ओळखले जाते, त्या प्रणित मोरेने 'बिग बॉस 19'च्या

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर