रुग्णवाहिका चालकांची मुजोरी; कल्याणमध्ये रुग्णवाहिकेच्या भाड्यावरून वाद, मजुराचा मृतदेह ३ तास रस्त्यावरच पडून!

कल्याण: कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर खासगी रुग्णवाहिका चालकांच्या दादागिरीमुळे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका गरीब मजुराचा मृतदेह रुग्णवाहिकेच्या भाड्यावरून झालेल्या वादानंतर तब्बल तीन तास रुग्णालयाच्या शवागारात पडून राहिला. भाडे कमी देण्यास तयार असलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिका चालकाला अडवल्याने हा संतापजनक प्रकार घडला, ज्यामुळे मृतदेहाचीही विटंबना झाल्याची चर्चा सुरू आहे. केडीएमसी प्रशासन यावर काय करते, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.



२५ हजार विरुद्ध १५ हजार: मृतदेह ताटकळला


तेलंगणा राज्यातील करिया बिच्चप्पा हा मजूर कल्याणमध्ये एका इमारतीवरून पडून मरण पावला. त्याच्या मृतदेहाचे रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. करियाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्याच्या तीन मुली आहेत. त्याच्या कमाईवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यामुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. नातेवाईकांनी आणि मित्रांनी पैसे गोळा करून करियाचा मृतदेह तेलंगणातील त्याच्या गावी नेण्याचे ठरवले.


त्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालक रोशन शेख याच्याशी संपर्क साधला असता, त्याने २५ हजार रुपये भाडे मागितले. कुटुंबीयांनी पैसे कमी करण्याची विनंती केली, पण शेखने ती नाकारली. त्याचवेळी, दुसरा चालक समीर मेमन १५ हजार रुपयांत मृतदेह घेऊन जाण्यास तयार झाला. करियाच्या नातेवाईकांनी त्याला होकार दिला, पण रोशन शेखने समीरला रोखले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. या दोघांच्या भाड्यावरून सुरू असलेल्या वादात करियाचा मृतदेह तीन तासांहून अधिक काळ शवगृहात पडून होता.



युनियनची दादागिरी की वाजवी भाडे?


या प्रकरणी चालक समीर मेमन म्हणाला की, "मी गरिबांची परिस्थिती पाहून कमी दरात तयार झालो, पण इथे कोणतेही युनियन नसताना दुसरा चालक 'युनियन'च्या नावाखाली दादागिरी करतोय." दुसरीकडे, रोशन शेखने सांगितले की, "७०० किमी अंतरासाठी २५ हजार रुपये भाडे योग्य होते. आम्ही कोणालाही अडवले नाही."


या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "रुग्णालयाबाहेर गरिबांची लूट आणि रुग्णवाहिका चालकांची मुजोरी ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही," असे स्थानिक सांगतात. केडीएमसी प्रशासन यावर फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


यापूर्वी याच रुग्णालयात केवळ हजार रुपयांवरून रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे, केडीएमसी प्रशासनातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी नेमके काय करत आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.