वरुण ऍरॉन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी

नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ च्या आधी माजी वेगवान गोलंदाज वरुण ऍरॉनची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सनरायर्झच्या फ्रँचायझीने सांगितले की, ऍरॉन न्यूझीलंडचा माजी गोलंदाज जेम्स फ्रँकलिनची जागा घेईल.


वरुणने २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीत नऊ एकदिवसीय आणि तितकेच कसोटी सामने खेळले. त्याने गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.


वरुणने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि भारतासाठी खेळलेल्या एकूण नऊ कसोटी सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याची इकॉनॉमी ४.७८ होती. त्याच वेळी कसोटी पदार्पणाच्या फक्त एक महिना आधी त्याला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. वरुणने नऊ एकदिवसीय सामन्यात ११ विकेट्स घेतल्या.


वरुण आयपीएलमध्येही खेळला होता आणि त्याने ५२ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण ४४ विकेट्स घेतल्या. वरुणने नोव्हेंबर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.तर तो नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. वरुणने एप्रिल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएलमध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता.

Comments
Add Comment

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

PV Sindhu Japan Open : जपान ओपन २०२६ बॅडमिंटन: सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

टोकियो : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने या मोसमातील सर्वोत्तम कामगिरींपैकी एक करत, चीनच्या जागतिक

ICC Code of Conduct : भारताचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला आयसीसीकडून ताकीद

नवी दिल्ली : एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १

FIFA WORLDCUP : फुटबॉल इतिहासातील अविश्वसनीय विक्रम... ऐकून थक्क व्हाल!

फुटबॉलची जागतिक पंढरी मानल्या जाणाऱ्या 'फिफा विश्वचषका'चा (FIFA World Cup) इतिहास अत्यंत गौरवशाली आणि रहस्यांनी भरलेला

FIFA : फिफा विश्वचषक ट्रॉफीचा रंजक इतिहास; सोनेरी चषकामागच्या काही अज्ञात गोष्टी

फिफा विश्वचषक ही जगातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा मानली जाते. मैदानावरील खेळाच्या थरारासोबतच, या

A rare coincidence in football: १९ वर्षांपूर्वी ज्या बाळाला मेस्सीने अंघोळ घातली, तोच आता विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी!

फुटबॉलच्या विश्वात नशिबाचा एक अत्यंत सुखद आणि चकित करणारा योगायोग समोर आला आहे. १९ वर्षांपूर्वी, २००७ मध्ये