हरियाणा आणि गोव्यासाठी नव्या राज्यपालांची तसेच लडाखसाठी नव्या नायब राज्यपालांची नियुक्ती

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवार १४ जुलै रोजी हरियाणा आणि गोव्यासाठी नव्या राज्यपालांची तसेच लडाखसाठी नव्या नायब राज्यपालांची नियुक्ती केली. प्रोफेसर असीम कुमार घोष यांना हरियाणाच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले. पुष्पपति अशोक गजपति राजू यांना गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले. राष्ट्रपतींनी लडाखचे सध्याचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर (डॉ.) बी.डी. मिश्रा (निवृत्त) यांचा राजीनामा स्वीकारत त्यांना जबाबदारीतून मुक्त केले. तसेच भाजपाच्या कविंद्र गुप्ता यांना लडाख या केंद्रशिसातित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदी नियुक्त केले.



सध्या बंडारू दत्तात्रेय हरियाणाचे आणि पीएस श्रीधरन पिल्लई गोव्याचे राज्यपाल आहेत. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशपत्रामुळे प्रोफेसर असीम कुमार घोष हे बंडारू दत्तात्रेय यांच्याकडून हरियाणाच्या राज्यपालपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तसेच पुष्पपति अशोक गजपति राजू हे पीएस श्रीधरन पिल्लई यांच्याकडून गोव्याच्या राज्यपालपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

याआधी रविवार १३ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार सदस्यांना राज्यसभेत खासदार म्हून नामनिर्देशित केले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रश्न समजून घेण्यास मदत व्हावी या उद्देशाने राष्ट्रपतींकडून विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले जाते. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मस्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे.
Comments
Add Comment

लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर केंद्र सरकारचा इशारा: भारतावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून,

भारतातील टीबीविरोधी मोहिमेचा मोठा टप्पा: भारतातील टीबी रुग्णांच्या संख्येत २१ टक्क्यांची घट

पंतप्रधान मोदींची आरोग्य क्षेत्राला शाबासकी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतात क्षयरोग

दिल्ली स्फोट प्रकरणी AIU ची अल फलाह विद्यापीठावर कारवाई

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरात आय ट्वेंटी कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला. या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी तपास पथकाने

टेलिग्राम हे दहशतवाद्यांसाठी नवीन चॅट डेस्टिनेशन

नवी दिल्ली : दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार बॉम्बस्फोटात सहभागी असलेले डॉ. उमर मोहम्मद आणि त्यांचे साथीदार

दिल्लीतील महिपालपूरमध्ये स्फोटाचा आवाज, महिला घाबरली आणि पोलिसांना दिली माहिती

दिल्ली : राजधानी दिल्लीतील महिपालपूर परिसरात स्फोटासारखा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती

दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा : हल्ल्याचे संपूर्ण ब्लूप्रिंट आले समोर !

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन आणि धक्कादायक