gold news marathi :सलग चौथ्यांदा सोने महाग टेरिफचा दबाव सोन्यात कायम ! 'इतक्याने' झाली वाढ !

प्रतिनिधी:आजही सलग चौथ्यांदा सोन्यात मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापारातील दबावामुळे सोन्यासह कमोडिटी बाजारातही अस्थिरता कायम आहे. युएसने काल युरोपियन युनियनवर परवा उशीरा ३०% कर, मेक्सिकोवर ३०% कर, कॅनडावर ३५% कर लादल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारासह सप्लाय चेन यंत्रणेवर दबाव तीव्र झाला. परिणामी आज सोन्याच्या आंतरराष्ट्रीय दरात वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १७ रुपयांनी वाढ घेत दर ९९८८ रूपये प्रति ग्रॅम दर सुरू आहे. २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १५ रूपयांनी वाढ झाल्याने दर ९१५५ रूपये प्रति ग्रॅम दर सुरू आहे. १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२ रूपयांनी वाढ झाल्याने प्रति ग्रॅम दर ७४९१ रूप यांवर पोहोचला आहे.

याशिवाय संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १७० रूपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर ९९८८० रूपयांवर गेली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १५० रूपयांनी वाढ झाल्याने दर पातळी ९१५५० रूपयांवर पोहो चली. १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १२० रूपयांनी वाढ झाल्याने दर पातळी ७४९१० रूपयांवर पोहोचली आहे. आज आंतरराष्ट्रीय सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Futures Index) यामध्ये सकाळी ०.२६% वाढ झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.१०%  वाढ झाल्याने स्पॉट दर ०.११% वाढ झाल्याने प्रति डॉलर सोन्याची किंमत ०.२१% वाढत ३३६२ औंसवर गेली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) निर्देशांकात ०.३४% वाढ झाल्याने एमसीए क्समध्ये सोन्याची दर पातळी ९८१५४ रूपयांवर गेली आहे. भारतातील मुंबई पुण्यासह सर्व प्रमुख शहरात २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ९९८८ रूपये,२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम किंमत ९१५५ रूपयांवर, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दर पातळी ७४९१ रू पयांवर पोहोचला आहे.

उद्या युएसमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index CPI) जाहीर होणार आहे. याआधारावर सोन्याची पुढील पातळी निश्चित होऊ शकते. जागतिक वातावरणातील सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्याचे महत्व वाढल्याने किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकेतील तज्ञांच्या मते उद्या जाहीर होणाऱ्या सीपीआयमध्ये ०.२३% घट होऊ शकते व कोर किंमत ०.३०% कमी होऊ शकते. तसे झाल्यास फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता प्रबळ होऊ शकते जेणेकरून आगामी काळाती ल सोन्यावरील दबाव कमी होऊ शकतो.
Comments
Add Comment

...तर मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मागील चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची

बिहारमध्ये कमळ फुलणार!

ओपनियन पोलच्या अंदाजानुसार एनडीएचे बिहारमध्ये सरकार नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६

मुंबई महापालिकेच्या या दोन विभागांना लाभले कायम सहायक आयुक्त

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदांच्या अनेक जागा रिक्त असून अनेक ठिकाणी प्रभारी सहायक

निवडणूक आयोग 'सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं'! राज ठाकरेंचा हल्लाबोल

पत्रकार परिषद पाहून मनसे अध्यक्ष संतापले; म्हणाले, 'आयोग निष्पक्ष नाही, महाराष्ट्रातील जनतेचा हा ढळढळीत

भाजप-राष्ट्रवादीची युती, एकनाथ शिंदे पडले एकाकी!

बदलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून मागील पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या

Breaking News : राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले; २ डिसेंबरला होणार मतदान

राज्यात आचारसंहिता लागू २४६ नगरपरिषद, ४२ नगरपंचायतींसाठी होणार मतदान २ डिसेंबरला मतदान, ३