मुंबई: मसाले, भाज्या यापाठोपाठ लसणाचाही भाव वाढत आहे. ३०० रुपये प्रति किलोने सध्या मिळणारा लसूण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गृहिणींनी फोडणीतून लसूण वगळला आहे, तर काहींनी आखडता हात घेतला आहे.
बाजारात काही महिन्यांपूर्वी १५०-२०० रुपये किलोने मिळणारा लसूण सध्या जवळपास २०० रुपये किलोने किरकोळ बाजारात मिळत आहे. तर सोललेला लसूण ४०० रुपये किलोने मिळत आहे. लसूण सोलण्यासाठी लागणारा वेळ वाचावा, यासाठी नोकरदार महिला बाजारात सोलून मिळणारा लसूण आवर्जून खरेदी करताना दिसतात. लसणाचा सीझन फेब्रुवारी ते मेपर्यंत असल्याने पावसाळ्यात त्याची किंमत वाढते. यंदा अनेक भागाला अवकाळी पावसाने झोडपल्याने लसणाचे पीक कमी आल. लसणाच्या मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने लसणाचे दर वाढत आहेत.