कानाची बात

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड


आई म्हणाली कानाची
काय सांगू बात
जरा खुट्ट वाजले की,
लगेच टवकारतात

हलक्या हाताने कधी
स्वतःला घेतात टोचून
दिमाखात मिरवतात
कधी कर्णफुले घालून

ओरडणं, खिदळणं
सारं सारं ऐकतात
नको ते ऐकून कधी
अडचणीतही आणतात

काहीजण गुपचूपपणे
कानमंत्र देतात
काहीवेळा दुर्लक्ष करून
कानामागे टाकतात

काही आपले कान उपटून
चांगलाच धडा देतात
लक्षात ठेवून हे काहीजण
कानाला लावतात खडा

कान देऊन ऐकल्यावर
सापडतो चांगला सूर
हलक्या कानाचा असणे
या दुर्गुणाला ठेवावे दूर

दुसऱ्यांबद्दल कान भरणे
ही गोष्ट चांगली नाही
कानीकपाळी ओरडून
आई सतत सांगत राही.
Comments
Add Comment

समुद्राच्या गाभ्यातील अदृश्य विष

पर्यावरण - मिलिंद बेंडाळे समुद्राचे वाढते तापमान, आम्लीकरण, प्लास्टिक प्रदूषण आणि अतिमासेमारी यामुळे सागरी

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची पाच वर्षे आणि महिलांचे संपलेले स्वातंत्र्य

आंतरराष्ट्रीय - आरिफ शेख तालिबानला सत्ता मिळवता आली; पण महिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन आधुनिक राष्ट्र उभे

मनाच्या आरपार

स्मृतीगंध - लता गुठे मन हा अवघ्या दोन अक्षरांचा शब्द! पण या दोन अक्षरांत माणसाचं संपूर्ण जग सामावलेलं आहे. मन हे

‘जिंदगी देनेवाले सुन…’

नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे कधी कधी माणूस अगदी निराश होतो. जगण्यात काही अर्थ नाही असे त्याला वाटू लागते.

आधी बीज एकले...

संवाद - गुरुनाथ तेंडुलकर ही गोष्ट तुम्ही कदाचित पूर्वी ऐकली-वाचली असेल. तरीही पुन्हा सांगतो. एका गावातला विठोबा

अस्थी सरोवर तीर्थ महात्म्य

महाभारतातील मोतीकण  - भालचंद्र ठोंबरे एकदा महर्षी अगस्ती ऋषी वेंकटाचलावर (सध्याच्या आंध्र पदेश तिरूमला