अस्थी सरोवर तीर्थ महात्म्य

महाभारतातील मोतीकण  - भालचंद्र ठोंबरे


एकदा महर्षी अगस्ती ऋषी वेंकटाचलावर (सध्याच्या आंध्र पदेश तिरूमला पर्वतावर) गेले. त्या ठिकाणी त्यांनी श्री विष्णूची घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन श्री विष्णूनी त्यांना वर मागण्यास सांगितले. अगस्ती ऋषीनी “ हे देवा! आपण सर्व भक्तांच्या दर्शनासाठी या व्यंकटाचलावरच कायम वास करावा’’ अशी विनंती केली. अगस्ती ऋषींची ती विनंती मान्य करून भगवान श्री विष्णू या ठिकाणी आपल्या वाहनाशिवाय चतुर्भुज रूपात वास करतात असा उल्लेख स्कंद पुराणात आहे.


फार पूर्वी दक्षिणेत चंद्रवंशातील तोंडमन नावाचा राजा राज्य करीत होता. तो अत्यंत धार्मिक वृत्तीचा व प्रजावत्सल असून श्री विष्णूंचा परमभक्त होता. एकदा त्याच्या राज्यात राहत असलेला विरशर्मा नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह त्याच्याकडे आला व राजाला म्हणाला, राजन! आम्हाला गंगा स्नानाची तीव्र इच्छा असल्याने आम्ही गंगा स्नानासाठी निघालो होतो. मात्र माझ्या पत्नीची प्रकृती ठीक राहत नसल्याने तिच्याने आता चालणे शक्य होत नाही, तरी मी गंगा स्नानास जाऊन परत येईपर्यंत आपण माझ्या पत्नीचा अतिथी म्हणून सांभाळ करावा. राजाने त्याच्या विनंतीला होकार दिला. व त्याप्रमाणे पत्नीला एका गृहात ठेवून सहा महिने पुरेल एवढे धनधान्य कपडालत्ता व पैसा दिला.


ब्राह्मणाला येण्यास सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला. दरम्यानच्या काळात ब्राह्मण पत्नीकडील धान्य व संपत्तीचा साठा संपला. राजाचेही कामाच्या व्यस्ततेमुळे अतिथीकडे लक्ष राहिले नाही. त्या स्वाभिमानी स्त्रीनेही राजाकडे विनंती अथवा मागणीही केली नाही. परिणामी अन्न व पैशाअभावी तिचा मृत्यू झाला. काही काळाने वीर शर्मा गंगास्नानाहून परत आला व राजाचे आपल्या पत्नीचा सांभाळ केल्याबद्दल आभार मानून आता पत्नीस नेण्यासाठी आलो असल्याचेही सांगितले. राजाला एका क्षणात सर्व आठवले. त्यांने आत जाऊन चौकशी केली असता ब्राह्मण पत्नी नुकतीच मरण पावल्याचे राजाला आढळून आले. तिचे प्रेत तसेच पडून होते. आपल्याकडून दुर्लक्ष झाल्याने ब्राह्मण पत्नी मरण पावली हे त्याच्या लक्षात आले.


घाबरलेला राजा कोणाला काहीही न सांगता श्रीविष्णूच्या दर्शनास व्यंकटाचलावर गेला व श्रीविष्णूंची प्रार्थना करून या संकटातून वाचवण्याची विनंती केली. श्रीविष्णूंनी त्याला त्या ब्राह्मण पत्नीचा मृतदेह तुझ्या अन्य पत्नी सोबत येथे आण व माझ्या निवासस्थानाच्या पूर्वेस असलेल्या अस्थी सरोवरातील जलाने त्या प्रेतास स्नान घाल म्हणजे मृत ब्राह्मण पत्नी जिवंत होईल, असे सांगितले. राजाने त्याप्रमाणे सर्व राण्यांसह त्या ब्राह्मण पत्नीच्या प्रेतालाही डोलीत घालून तीर्थाच्या ठिकाणी आणले. राजाने राण्यांना सर्व परिस्थिती कथन केली व त्या प्रेताला स्नान घातले, असता ब्राह्मण पत्नी जिवंत झाली. राजाने परत येऊन ब्राह्मणाची पत्नीशी भेट घालून दिली. तसेच ब्राह्मण दांपत्याचा भरपूर दान व दक्षिणा देऊन सत्कार केला.
कालांतराने राजाने आपल्या पुत्राला राज्यपदी बसवून स्वतः श्रीविष्णूंच्या तपश्चर्येत लीन झाला. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन श्री विष्णूंनी त्याला वैकुंठधामास पाठविले.

Comments
Add Comment

समुद्राच्या गाभ्यातील अदृश्य विष

पर्यावरण - मिलिंद बेंडाळे समुद्राचे वाढते तापमान, आम्लीकरण, प्लास्टिक प्रदूषण आणि अतिमासेमारी यामुळे सागरी

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची पाच वर्षे आणि महिलांचे संपलेले स्वातंत्र्य

आंतरराष्ट्रीय - आरिफ शेख तालिबानला सत्ता मिळवता आली; पण महिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन आधुनिक राष्ट्र उभे

मनाच्या आरपार

स्मृतीगंध - लता गुठे मन हा अवघ्या दोन अक्षरांचा शब्द! पण या दोन अक्षरांत माणसाचं संपूर्ण जग सामावलेलं आहे. मन हे

‘जिंदगी देनेवाले सुन…’

नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे कधी कधी माणूस अगदी निराश होतो. जगण्यात काही अर्थ नाही असे त्याला वाटू लागते.

आधी बीज एकले...

संवाद - गुरुनाथ तेंडुलकर ही गोष्ट तुम्ही कदाचित पूर्वी ऐकली-वाचली असेल. तरीही पुन्हा सांगतो. एका गावातला विठोबा

दाद

- संवाद, निशा वर्तक आई... डोळे बंद कर!” दहा वर्षांची सई दोन्ही हात पाठीमागे लपवून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड