अंतराळातून शुभांशु शुक्ला यांचा निरोप, अनडॉकिंगच्या आधी म्हणाले, भारत सारे जहाँ से अच्छा

नवी दिल्ली: भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचा ऐतिहासिक प्रवास करून आता अंतराळातून निरोप घेत आहेत. हा एक क्षण निरोप समारंभाच्या रूपात संध्याकाळी ७.४५ मिनिटांनी आयोजित करण्यात आला. हा समारंभ लाईव्ह करण्यात आला जो जगभरातील लोकांनी पाहिला. फेअरवेल कार्यक्रमामध्ये Ax-4 मिशनची टीम आण नासाची Expedition 73 टीमच्या सदस्यांचा समावेश होता. शुभांशू शुक्ला आयएसएसवर पोहोचणारे पहिले भारतीय आहेत. फेअरवेल समारंभात शुभांशु शुक्लाने भारतासाठी मेसेज देताना म्हटले, सारे जहाँ से अच्छा.

२६ जून २०२५ला नासाच्या केनेडी स्पेस स्टेंटर येथून स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानच्या माध्यमातून शुभांशु शुक्ला आणि त्याचे सहकारी मिशनसाठी रवाना झाले होते. या मिशनमध्ये अमेरिकेची अंतराळवीर पेगी व्हिटसन कमांडर म्हणून होती तर इतर सद्स्यांमध्ये पोलंडचे सावोस्ज उजनान्स्की आणि हंगेरीचे तिबोर कप होते.

 



या चौघांनी मिळून २५० हून अधिक वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा आणि ६ मिलियन अंतरापेक्षाचे अधिक अंतर कापले. १७ दिवसांच्या या प्रवासादरम्यान अंतराळ यानाच्या दलाने ६०हून वैज्ञानिक प्रयोग केले.
Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या