मागणी घटल्याने कांद्याच्या दरात घसरण, शेतकऱ्याची चिंता वाढली

लासलगाव : मागील काही दिवसापासून सातत्याने कांद्याच्या मागणीमध्ये घट झाल्यामुळे आणि आवश्यक त्या पद्धतीप्रमाणे खरेदी होत असल्यामुळे भावामध्ये मोठ्या प्रमाणावर ती घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कांद्याचे पीक घेऊन कर्जबाजारी होत असल्याचे चित्र समोर येत आहे.


कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सध्या लासलगाव व पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सरासरी दर ७०० ते ८५० रुपये क्विंटल इतके असून, उत्पादन खर्च १२०० ते १४०० रुपये क्विंटल आहे. या तफावतीमुळे शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला.


लासलगाव बाजार समितीत दररोज सरासरी १८ ते २० हजार क्विंटल कांद्याची आवक असूनही व्यापाऱ्यांची मागणी मंदावली आहे. 'नाफेड'ची खरेदी निवडक बाजारा समितीमध्ये झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. परिणामी, मोठ्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.


सातत्याने कांद्याच्या दरामध्ये घट होण्यामागे या परिसरातील जाणकारांच्या मते बाजारातील कांद्याची मागणी ही कमी झालेली आहे. कांद्याची साठवणूक करण्याची मर्यादा यावर मोठा परिणाम करीत आहे. निर्यात क्षेत्रामध्ये केंद्र सरकारचे जे धोरण आहे. ते पूर्णपणे धरसोड वृत्तीचे आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हात दरावरती होत आहे.

Comments
Add Comment

अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची - उदय सामंत

अमरावती : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील

नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल

कार्तिकी एकादशीला कोण करणार पंढरपूरला विठ्ठलाची पूजा, शिंदे की पवार?

सोलापूर : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण

पापलेट उत्पादनात घट का झाली?

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मत्स्य

पुणेकरांनी लावली महामेट्रोची वाट! गुटखा-पानाच्या तुंबा-यांनी रंगल्या भिंती, जीने आणि गाड्या...

पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त पुणे : सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या