दादर पश्चिम फेरीवाल्यांवर कारवाईचा केवळ फार्सच!

मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानकांसह महत्वाच्या ठिकाणी फेरीवाल्यांवर पोलिस आणि महापालिकेच्यावतीने संयुक्तपणे कारवाई सुरु असली तरी प्रत्यक्षात बोरीवली वगळता कुठेही ठोस कारवाई दिसून येत नाही. दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या परिसरातही ही कारवाई सुरु असली तरी फारशी कडक कारवाई दिसून येत नाही. रेल्वे स्थानकाला विळखा आणि दुरवर कारवाई केली जात असल्याने आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी असाच प्रकार दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने रेल्वे स्थानकांसह २० ठिकाणे फेरीवाला मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिस आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर देवेन भारती यांनी पोलिसांना सूचना देत सर्व रेल्वे स्थानके फेरीवाला मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ६ मे २०२५ पासून दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याच्या कारवाईला सुरुवात झाली. मात्र, महापालिका आणि पोलिस यांच्या माध्यमातून कारवाई सुरु असली तरी प्रत्यक्षात या कारवाईचा प्रभाव दिसून येत नाही. स्थानक रोड असलेल्या न्यायमूर्ती रानडे मार्गांवर कारवाई केली असेल तर स्थानकाबाहेर तसेच डिसिल्व्हा मार्ग आणि जावळे मार्गावर फेरीवाले हे ठाम मांडून व्यवसाय करताना दिसतात. मात्र दीडशे मीटर बाहेरील एन सी केळकर मार्गावर कारवाई केली जाते. एवढेच काय तर रात्री साडेसात नंतर तर रेल्वे स्थानकाला पुन्हा फेरीवाल्यांचा विळखा घातला जातो आणि पुलाखालील भाग आणि स्थानकाच्या भिंती खेटून तसेच प्रवेशद्वाराजवळच फेरीवाले बसून व्यवसाय करत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असतानाही या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नाही.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंबई : गोरेगावच्या नेस्को मैदानावर आज (गुरुवार २ ऑक्टोबर २०२५) शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ

राज्यभरात आज दसरा मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे, नेस्कोमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे, तर बीडमध्ये पंकजा मुंडेंचा मेळावा

मुंबई : राज्यभरात आज विविध राजकीय नेत्यांचे दसरा मेळावे होत आहेत.  यंदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि

८ ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

मुंबई (प्रतिनिधी) : २९ सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान

सेंट झेवियरमधील भूमिगत पाण्याच्या साठवण टाकीचे नियोजन फसले

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील सर्वात मोठे पुरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या हिंदमाता सिनेमा

अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश

कोस्टल रोड- मार्वे रोड जोडणाऱ्या मार्गावरील पुलांच्या बांधकामाला आता गती, मागवल्या तब्बल २२०० कोटी रुपयांच्या निविदा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड मार्वे रोडशी जोडणारे नवीन मार्ग आणि