Accident News: अमरनाथ यात्रेदरम्यान अपघात! कुलगाममध्ये एका ताफ्याच्या तीन बसची टक्कर, अनेकजण जखमी

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील खुदवानी भागात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर अमरनाथ यात्रेच्या ताफ्याच्या तीन बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात १० हून अधिक यात्रेकरू जखमी झाले आहेत.


बालटालकडे जाणाऱ्या यात्रेच्या ताफ्याच्या तीन बस एकमेकांवर आदळल्याची घटना ताचलू क्रॉसिंगनजीक झाली आहे.


अपघातात जखमी झालेल्या सर्व यात्रेकरूंना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. कैमोह रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली की, सुमारे नऊ यात्रेकरूंना प्राथमिक उपचार दिल्यानंतर अनंतनागमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होण्यास सांगितले आहे. सर्व जखमी यात्रेकरूंच्या दुखापती किरकोळ असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी माहिती दिली.


अपघातातील जखमी प्रवाशांसाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत आणि त्यांच्या सोयी आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील