Tata Motors EV: टाटा मोटर्सतर्फे कर्व्ह.इव्ही आणि नेक्सॉन.इव्हीसाठी आजीवन बॅटरी वॉरंटी

मुंबई:भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या टाटा मोटर्स या देशातील इलेक्ट्रिक वाहन क्रांतीचे अग्रणी आणि देशातील आघाडीचा एसयूव्ही उत्पादक यांनी आज कर्व्ह.इव्ही (Curve.ev),नेक्सॉन.इव्ही (Nexon.ev) ४५ केडब्ल्यूएचसाठी आजीवन बॅटरी वॉरंटी सादर करत असल्याचे जाहीर केले आहे. टाटा मोटर्सतर्फे (Tata Motors) अलीकडेच लॉन्च केलेल्या हॅरियर.इव्हीसोबत सर्वप्रथम आजीवन एचव्ही बॅटरी वॉरंटी देऊ करण्यात आली होती. देशभरातील ग्राहकांकडून या ऑफरला भरपूर प्रशंसा मिळाली होती. या उदंड प्रतिसादाने प्रोत्साहित होऊन कंपनीने आता आपल्या उपरोक्त दोन लोकप्रिय एसयूव्हीच्या वर्तमान आणि नवीन ग्राहकांना ही ऑफर देऊ केली आहे.


टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्‍स म्हणाले,' प्रीमियम इव्ही टेक्नॉलॉजी सार्वत्रिक करून आम्ही भारतातील इव्ही श्रेणीच्या वृद्धीत लक्षणीय भूमिका बजावली आहे. ग्राहकांना मालकीचा चिंता मुक्त अनुभव देण्याचा विश्वास रुजवण्याची आमची क्षमता हा या वाढीमागचा मुख्य कारक आहे.आज आमच्या कर्व्ह.इव्ही आणि नेक्सॉन.इव्ही ४५ केडब्ल्यूएच गाड्यांच्या मालकांपर्यंत आजीवन एचव्ही बॅटरी वॉरंटी सोल्यूशन दाखल करून हा चिंता-मुक्त अनुभव अधिक ग्राहकांपर्यंत विस्तारित करत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. ही आगळीवेगळी ऑफर देऊन आम्ही आमच्या प्रत्येक टाटा.इव्ही खरेदीदारासाठी खरोखर चिंता-मुक्त आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या मालकीचा अनुभव घेऊन येत आहोत.'


बॅटरीचे दीर्घकालीन आरोग्य आणि बॅटरी बदलण्याचा खर्च हा इव्हीचा अंगिकार करण्यातील एक मोठा अडथळा दूर करून टाटा.इव्हीने ही उपाययोजना करून आपल्या ग्राहकांसाठी अधिक चांगला मालकीचा अनुभव सुनिश्चित केला आहे. कोणत्याही इव्ही खरीदेसाठी ही वॉरंटी म्हणजे खूप व्यापक हमी आहे. ही वॉरंटी आता कर्व्ह.इव्ही आणि नेक्सॉन.इव्ही ४५ केडब्ल्यूएचच्या सर्व खाजगी व्यक्तिगत ग्राहकांना देऊ करण्यात आली आहे, ज्यात उपरोक्त एसयूव्हीपैकी कोणतीही गाडी पहिल्यांदाच खरेदी करणारे ग्राहक आणि वर्तमान मालक (Existing Owner) यांचा समावेश आहे.


याविषयी नेमक्या शब्दात कंपनीने म्हटले आहे की,' या नवीन वॉरंटीमुळे इव्हीच्या दीर्घकालीन पुनर्विक्री मूल्यात ( Resale Value) वाढ होईल तसेच गाडीच्या देखभालीमागे होणारा वाहन-मालकांचा खर्च साधारणतः १० वर्षात अंदाजे ८-९ ला ख मोठ्या प्रमाणात वाचेल. त्यामुळे इव्ही खरेदीदारांसाठी हा एक आकर्षक प्रस्ताव आहे. या व्यतिरिक्त टाटा.इव्हीच्या वर्तमान मालकांसाठीच्या खास लॉयल्टी प्रोग्रामचा एक भाग म्हणून कंपनी कर्व्ह.इव्ही,नेक्सॉन.इव्ही ४५ केडब्ल्यूएचच्या खरेदीवर ५०,००० चा थेट लाभ देखील प्रदान करत आहे.'

Comments
Add Comment

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी