SEBI Raid ब्रेकिंग न्यूज: सेबीच्या देशभरात ८० ठिकाणी पुन्हा धाडसत्र हाती लागले महत्वाचे पुरावे !

  79

प्रतिनिधी: सेबीने बाजारातील घोटाळेबाजांना धडा शिकविण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. प्रसारमाध्यमांनी नुकत्याच छापलेल्या अहवालात माहिती दिल्याप्रमाणे सेबीने देशभरात ८० ठिकाणी आणखी एकदा धाडी टाकल्या आहेत. 'पंप आणि डंप (Pump and Dump) घोटाळ्याचा संदर्भात सेबीने छापेमारी केली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसात सेबी (Security Exchange Board of India SEBI) नियामक मंडळाने छापेमारी केली आहे. यात तब्बल २०० सूचीबद्ध (Listed) कंपन्यावर छापेमारी सेबीने केली आहे. छापेमारीत महत्वाचा ऐवज सेबीच्या हाती लागला आहे. केलेल्या छापेमारीत १०० पेक्षा अधिक संगणक, १५० पेक्षा मोबाईलमधून सेबीच्या हाती संवेदनशील माहिती हाती लागली आहे. पुढे चौकशीत सेबीला पुरावेजन्य माहिती म्हणून या साहित्याचा उपयोग चौकशीत होऊ शकतो असे सुत्रांनी म्हटले.


या सगळ्या प्रकरणात आता सेबीने नवे वळण देऊन संबंधित कंपन्यांची सखोल चौकशी सुरू केली. यापूर्वीही जून महिन्यात सेबीने विशेष सर्च ऑपरेशन केले होते त्यामध्ये काही अहमदाबाद येथील कंपनीच्या समावेश होता. ३० जूनला आपल्या प्रसिद्धीपत्रकात सेबीने म्हटले होते की, ३० जून रोजी एका निवेदनात सेबीने म्हटले आहे की,याद्वारे स्पष्ट केले जाते की सेबीने जून २०२५ मध्ये काही स्क्रिपमधील पंप आणि डंपच्या संदर्भात अनेक ठिकाणी शोध आणि जप्तीची कारवाई केली आहे आणि गुन्हेगारी पुरावे जप्त केले आहेत. या प्रकरणाची चौकशी प्रगतीपथावर आहे.


सेबीने याविषयी आणखी म्हटले की,'या कारवाईमुळे गुन्हेगारी पुरावे जप्त करण्यात आले, ज्याची आता तपासणी केली जात आहे. आवश्यक असल्यास ठोस निष्कर्षाप्रत जाऊन कारवाई केली जाईल'. सेबीचे अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांनी जाहीर कार्यक्रमात गैरप्रकारात सेबी कठोर कारवाई करणार. त्यात कसलीही गय केली जाणार नाही असे ठणकावून सांगत सेबीचा आक्रमक इरादा यावेळी स्पष्ट केला होता. कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा आड‌ काही आल्यास खपवून घेतले जाणार नाही अशा स्पष्ट शब्दात सेबीने स्पष्ट केले होते. याच धर्तीवर जेन स्ट्रीटची चौकशी सुरू असतानाच मागे घडलेल्या पंप आणि डंप‌ प्रकरणातही चौकशीला‌ वेग आला आहे.


घोटाळेबाज लोक बाजारपेठेत कसे फेरफार हाताळणी करतात?


पंप अँड डंप ऑपरेशन्सचा प्रकरण म्हणजे अनेक प्रवर्तक (Promoter) नकली नावाने कंपन्या उघडताच संबंधित शेअर्समध्ये खोटी हवा निर्माण नफा बुकिंग करत नंतर घसरण सुरू होण्यापूर्वी आपला नफा मिळवता तो शेअरच विकून टाकतात. फसवणूक करणारे सामान्यतः कमी किमतीच्या शेअर्सना लक्ष्य (Target) करतात आणि कमी किमतीत मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी करतात. पुढे ते टेलिग्राम,मीडिया, सोशल मीडिया, बनावट बातम्या किंवा प्रभावशाली मंचांद्वारे किरकोळ गुंतवणूकदारांना स्टॉक खरेदी करण्यासाठी आमिष दाखवण्यासाठी स्टॉकभोवती प्रचार निर्माण करतात.


एकदा किरकोळ गुंतवणूकदार मोठ्या संख्येने शेअर्स खरेदी करतात आणि स्टॉक लक्ष्यित किमतीपर्यंत वाढतो, तेव्हा फसवणूक करणारा त्यांचे शेअर्स विकतो, नफा मिळवतो आणि शेअर डंपिंगनंतर स्टॉक क्रॅश झाल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागतो. नेमक्या अशा प्रकारे किरकोळ गुंतवणूकदारांना मोठा तोटा होतो व निर्देशांकातही फेरफार अथवा फुगवटा तयार केला जातो.

Comments
Add Comment

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल