Delhi News : दिल्लीत ४ मजली इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

दिल्ली : दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेलकम परिसरातील जनता मजदूर कॉलनीत शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ४ मजली इमारत कोसळली. दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत अनेक लोक उपस्थित होते, त्यापैकी अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.



अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ६ जणांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, ५ ते ६ जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मदत आणि बचावकार्य अत्यंत वेगाने सुरू आहे. हा परिसर खूप दाट लोकवस्तीचा असल्याने आणि अरुंद रस्ते असल्याने बचावकार्य अवघड आहे.


या घटनास्थळी ७ अग्निशमन दलाच्या गाड्या उपस्थित आहेत आणि स्थानिक पोलीस आणि टीम ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत. दुर्घटनेमागेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही परंतु इमारत खूपच जीर्ण असल्याचं म्हटलं जातंय, ज्यामुळे ही दुर्घटना घडली.

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या