कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू

केडीएमसी क्षेत्रात नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर


कल्याण (प्रतिनिधी): कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात डेग्यूमुळे कल्याणातील बेतुरकर पाडा परिसरातील एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने आरोग्य यंत्रणासह, घनकचरा व्यवस्थापनाच्या जंतुनाशक फवारणी, घुरवणी आणि डेग्यु, मलेरिया, ताप, साथरोग याबाबत जनजागृती मोहीम प्रभावीपणे का राबविली जात नाही. परिसर स्वच्छता मोहीम कागदावरच का ? असा संतप्त सवाल यानिमित्ताने होत आहे.


कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा परिसरात राहत असलेल्या तरूण विलास म्हात्रे यांचा गुरुवारी सकाळी डेंग्यूमुळे दुर्दैवी मुत्यु झाला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरी आरोग्य प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे. बुधवारी मनसे पक्षाने थेट मुख्यालयावर धडक देत, डेंग्यू मलेरिया संदर्भात प्रश्नाला जाब विचारत प्रशासनाला धारेवर धरले. तरी प्रशासन यंत्रणा जागी झाली नसल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने पावसाळा पार्श्वभूमीवर मनपा क्षेत्रात व्यापक घुरवणी, फवारणी, अळीनाशक, जंतुनाशक फवारणी मोहीम होणे गरजेचे आहे. व्यापक जनजागृती माध्यमातून दक्षता काय घ्यावी हे जनसामान्यांना पर्यंत पोहचविणे गरजेचे दिसत आहे.


मे पासून आत्तापर्यंत केडीएमसी हद्दीत डेंगूचे ३५ रुग्ण आहेत. तसेच मलेरियाचे जून महिन्यात ४१ रुग्ण आढळून आले. जुलै महिन्यात १८ रुग्ण आढळून आले असल्याची त्रोटक माहिती केडीएमसी प्रशासनाकडून बुधवारी देण्यात आली होती. तर केडीएमसीकडून आत्तापर्यंत २८ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून जवळपास ३५० घराजवळ कंटेनर इममध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्याचा अहवाल समोर आला आहे. यासंदर्भात डेंग्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस ड्राय डे मार्फत पाणी साठवणूक टाळून डेंग्यू मच्छर संभाव्य वाढीस पोषक वातावरण होणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे.


पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या घटक यांत पाणी साठणार नाही. मांची दक्षता घेतली पाहिजे. मेलरिया, डेग्यु संदर्भात आरोग्य विभागातील कर्मचारी सर्व्हेक्षण स्लम एरिमा ते संकुला पर्यंत केले जाते. ज्या परिसरात संभाव्य डेग्यु रूग्ण आढळल्यास त्या परिसरात धुरवणी फवारणी आदी तातडीने केली जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यामांना सांगितले.

Comments
Add Comment

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.