इनाम उल हक आणि राधिकाचं एकत्र फिरणंच ठरलं तिच्या हत्येचं कारण ?

गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राममध्ये राहणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर टेनिसपटू म्हणून प्रगती करत असलेल्या आणि स्वतःची टेनिस अकादमी चालवत असलेल्या राधिक यादवची तिचे वडील दीपक यादव यांनीच हत्या केली. दीपक यादव यांनी मुलीवर पाच गोळ्या झाडल्या. यापैकी तीन गोळ्या राधिकाला लागल्या. जवळून झालेल्या गोळीबारामुळे गंभीर जखमी झालेल्या राधिकाचा थोड्याच वेळात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी राधिकाच्या वडिलांना अटक केली आहे. दीपक यादव यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आता नवी माहिती हाती येऊ लागली आहे. इनाम उल हक आणि राधिकाचं एकत्र फिरणंच तिच्या हत्येचं कारण ठरल्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.

राधिकाला टेनिस अकादमीतून मोठं उत्पन्न मिळत होतं. या पैशांवर यादव कुटुंब सुखात राहत होतं. पण मागील काही दिवसांपासून ओळखीतल्या काही जणांनी दीपक यांना राधिकाच्या अकादमीवरुन टोमणे मारायला सुरुवात केली होती. मुलीच्या पैशांवर आईवडील जगत आहेत, असं काही जण उघडपणे दीपक यांच्यासमोर बोलायचे. हा प्रकार असह्य झाला आणि दीपक यांनी राधिकाची हत्या केली, असा संशय सुरुवातीला व्यक्त होत होता. पण हत्येचे कारण वेगळेच असल्याचे पोलीस चौकशीतून पुढे आले आहे.

टेनिस अकादमीतून उत्तम कमाई करुन घर चालवत असलेली राधिका मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाप्रेमी झाली होती. राधिकाला नवनवी रील करण्याचं वेड लागलं होतं. तिचे अनेक मित्र होते. या मित्रांसोबत बिनधास्त फिरायला जायचे आणि तिथे व्हिडीओ करुन सोशल मीडियावर पोस्ट करायचे हा प्रकार वाढ चालला होता. मागील काही दिवसांपासून राधिका इनाम उल हक सोबत जास्त फिरत होती. राधिकाचे इनाम उल हक सोबतचे व्हिडीओ वाढले होते. हा प्रकार राधिकाचे वडील दीपक यादव यांना बिलकूल आवडला नव्हता. याच कारणामुळे संतापलेल्या दीपक यादव यांनी राधिकाची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला

Mazgaon Ganpati : मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव, पोलिसांकडून तपास सुरू, पहा Video

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग