राधिकाला टेनिस अकादमीतून मोठं उत्पन्न मिळत होतं. या पैशांवर यादव कुटुंब सुखात राहत होतं. पण मागील काही दिवसांपासून ओळखीतल्या काही जणांनी दीपक यांना राधिकाच्या अकादमीवरुन टोमणे मारायला सुरुवात केली होती. मुलीच्या पैशांवर आईवडील जगत आहेत, असं काही जण उघडपणे दीपक यांच्यासमोर बोलायचे. हा प्रकार असह्य झाला आणि दीपक यांनी राधिकाची हत्या केली, असा संशय सुरुवातीला व्यक्त होत होता. पण हत्येचे कारण वेगळेच असल्याचे पोलीस चौकशीतून पुढे आले आहे.
टेनिस अकादमीतून उत्तम कमाई करुन घर चालवत असलेली राधिका मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाप्रेमी झाली होती. राधिकाला नवनवी रील करण्याचं वेड लागलं होतं. तिचे अनेक मित्र होते. या मित्रांसोबत बिनधास्त फिरायला जायचे आणि तिथे व्हिडीओ करुन सोशल मीडियावर पोस्ट करायचे हा प्रकार वाढ चालला होता. मागील काही दिवसांपासून राधिका इनाम उल हक सोबत जास्त फिरत होती. राधिकाचे इनाम उल हक सोबतचे व्हिडीओ वाढले होते. हा प्रकार राधिकाचे वडील दीपक यादव यांना बिलकूल आवडला नव्हता. याच कारणामुळे संतापलेल्या दीपक यादव यांनी राधिकाची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे.