भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविणार - उदय सामंत

मुंबई : राज्यात भटक्या श्वानांनी नागरिकांचा चावा घेण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा श्वानांची नसबंदी करणे तसेच त्यांना रेबीज विरोधी लस देणे याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आहेत. या सूचनांच्या अखत्यारीत राहून श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, तसेच यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मंत्री श्री. उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य अमित गोरखे यांनी यासंदर्भातील अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती.


मंत्री श्री. सामंत म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रात २०२२ साली १६,५६९ श्वानांनी नागरिकांचा चावा घेतला. २०२३ साली २२,९४५ तर २०२४ साली २५,८९९ श्वानांनी नागरिकांचा चावा घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात २०२२-२३ मध्ये १,४२१ श्वानांची नसबंदी करण्यात आली. २०२३-२४ मध्ये ३,५९८ तर २०२४-२५ मध्ये ३,३४६ भटक्या श्वानांची नसबंदी करण्यात आली. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका क्षेत्रात २०२२-२३ मध्ये ९,६६३ श्वानांची नसबंदी करण्यात आली. २०२३-२४ मध्ये २६ हजार तर २०२४-२५ मध्ये ५६,५११ भटक्या श्वानांची नसबंदी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भटक्या श्वानांची नसबंदी केल्यानंतर त्याला जेथून आणले पुन्हा त्याच ठिकाणी नेऊन सोडावे लागते. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या पातळीवर निविदा काढून उपाययोजना करतात. तथापि, ही समस्या राज्यात सर्वत्र असल्याने राज्य शासनाच्या पातळीवर विशेष मोहीम हाती घेण्यात येईल आणि त्यासाठी निधीची तरतूद करता येईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात घरातील पाळीव श्वानांसाठी परवानगी घेण्याचा नियम केलेला आहे, असाच नियम राज्यात सर्वत्र लागू करण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेच्या उत्तरात सांगितले.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या