गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित

गांधीनगर : वडोदरा आणि आणंदला जोडणाऱ्या ४० वर्षे जुन्या गंभीरा पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळल्याने आतापर्यंत १७ जणांचा बळी गेला आहे, ज्यात एकाच कुटुंबातील अनेकांचा समावेश आहे.मृतांचा आकडा वाढत असताना, अजूनही ३ जण बेपत्ता असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. तर, या प्रकरणात आता ४ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.


बुधवारी (दि.९) सकाळी पाद्रा शहराजवळील गंभीरा गावाजवळ घडलेल्या या भीषण दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे.या घटनेनंतर गुजरात सरकारने तातडीने कठोर पाऊले उचलत रस्ते आणि इमारत विभागाच्या चार अभियंत्यांना निलंबित केले आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारीच(दि.१०) या कारवाईचे आदेश दिले. अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने सरकारच्या भूमिकेचे कौतुक होत असले तरी, या दुर्घटनेमागे अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.



या घटनेत अनेक वाहने पुलासोबत नदीच्या खोल दलदलीत गडप झाली.यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलची (एसडीआरएफ) पथके अहोरात्र बचावकार्य करत आहेत, मात्र संततधार पाऊस आणि नदीतील खोल चिखल बचावकार्यात मोठे आव्हान निर्माण करत आहे. "पावसामुळे आणि दलदलीमुळे यंत्रसामग्रीचा वापर करणे कठीण झाले आहे," असे वडोदराचे जिल्हा दंडाधिकारी अनिल धामेलिया यांनी सांगितले.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना