पुण्याच्या गुडलक कॅफेत 'बन मस्का'मध्ये आढळले काचेचे तुकडे

पुणे: पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील (FC Road) गुड लक कॅफे एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आला आहे. आकाश जलगी नावाच्या एका ग्राहकाने दावा केला आहे की, कॅफेत त्यांना सर्व्ह करण्यात आलेल्या बन मस्कामध्ये काचेचे तुकडे आढळले आहेत. या घटनेनंतर त्यांनी तात्काळ व्हिडिओ बनवला आणि कॅफे कर्मचाऱ्यांना जाब विचारला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


नेमकं काय घडलं?


आकाश जलगी आपल्या पत्नीसोबत गुड लक कॅफेमध्ये चहा आणि बन मस्का घेण्यासाठी गेले होते. त्यांना दिलेल्या बन मस्कामध्ये सुरुवातीला बर्फासारखे काहीतरी दिसले. मात्र, नीट पाहिल्यावर 'बन मस्का'मध्ये बर्फ नसून काचेचे तुकडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे आकाश यांचा पारा चढला आणि त्यांनी पत्नीला चहा न पिण्यास सांगत कॅफे कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. कॅफे व्यवस्थापनाने या घटनेबद्दल माफी मागितली आणि बिल घेतले नाही.


आकाश जलगी यांचे म्हणणे आहे की, जर हे काचेचे तुकडे पोटात गेले असते, तर मोठा अनर्थ घडला असता. त्यांनी याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) कडे ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. कॅफे मालकांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, ते बन बाहेरून (outsource) मागवतात आणि संबंधित व्यक्तीला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून गुड लक कॅफे हे पुण्यातील एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय ठिकाण आहे, जिथे खवय्ये आवर्जून बन मस्काचा आस्वाद घेण्यासाठी येतात. मात्र, या घटनेमुळे कॅफेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून, स्वच्छतेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Mangalagaur 2026 : आजपासून मंगळागौरला सुरूवात...जाणून घ्या शुभ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत अन् पौराणिक कथा!

श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीचे आगमन श्रावण महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात सणांची

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर