नवा मोबाईल घेण्याचा विचार करताय? तर हा आहे तुमच्यासाठी मस्त ऑप्शन

मोटोरोलाचा मोटो G96 5G भारतात लाँच


मुंबई : मोटोरोला कंपनीने बुधवारी 9 जुलैला भारतात मध्यम श्रेणीतील ग्राहकांसाठी मोटो जी 96 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनसोबत 1 वर्षासाठी OS अपडेट्स आणि 3 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स दिले जातील.

मोटो जी 96 5G मध्ये 6.67 इंचाचा FHD+ pOLED 3D कर्व्हड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 1600 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. तो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने संरक्षित आहे आणि स्मार्ट वॉटर टच देखील सपोर्ट करतो.

या स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 33W चार्जर सह येते. तसेच यामध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, डॉल्बी अ‍ॅटमॉस, हाय-रेझ ऑडिओ, आणि Mमोटो स्पेशियल साउंड देण्यात आला आहे. फोनला IP68 रेटिंग आहे म्हणजेच तो पाण्यापासून सुरक्षित आहे.

मोटो जी 96 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 प्रोसेसर, 8GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज आहे. यामध्ये 24GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम वापरण्याचा पर्यायही आहे.

कॅमेराबाबत बोलायचं झालं तर, यात 50MPसोनी लिटिया 700C मुख्य कॅमेरा (OIS सह), 8MP अल्ट्रावाईड + मॅक्रो + डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे जो 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग करतो. यासोबत गुगल फोटो चे एआय टूल्स जसे की मॅजिक इरेजर, फोटो ब्लर अनब्लर, आणि म्याजिक एडिटर देखील दिले आहेत.

मोटो जी 96 5G दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असेल:

8GB/128GB – ₹17,999

8GB/256GB – ₹19,999

हा स्मार्टफोन अ‍ॅश-ली ब्ल्यू , ग्री-नर पॅस्चर्स, कॅटलिया ऑर्किड आणि ड्रेस्डन ब्ल्यू या रंगांमध्ये उपलब्ध असेल. विक्री 16 जुलैपासून फ्लिपकार्ट, मोटोरोला च्या वेबसाइटवर आणि रिलायन्स डिजिटल सह देशभरातील प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये सुरू होईल.
Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते