Tata Consultancy Services TCS Q1 Results: मोठी बातमी! बहुप्रतिक्षित टीसीएसचा निकाल जाहीर ! 'इतक्या' टक्क्याने निव्वळ नफ्यात वाढ महसूलात मात्र....

  88

प्रतिनिधी: टाटा कन्सल्टंसी सर्विसेस (Tata Consultancy and Services TCS) कंपनीने आपला बहुप्रतिक्षित निकाल जाहीर केला आहे. कंपनीला आर्थिक वर्ष २०२५-२६ पहिल्या तिमाहीत (Q1 Results)१२७६० कोटींचा नफा प्राप्त झाला आहे. मागील तिमाहीत कंपनीला १२२४ कोटींचा निव्वळ नफा झाला होता. त्यामुळे कंपनीच्या एकूण निव्वळ नफ्यात ४.३८% वाढ झाली आहे. मात्र कंपनीच्या महसूलात १.६% घसरण झाली. मागील तिमाहीतील ६४४७९ कोटींच्या तुलनेत घसरण होत या तिमाहीत कंपनीला ६३४३७ कोटी महसूल मिळाला आहे. कंपनीच्या एकूणच अपेक्षित आकडेवारीपेक्षा कंपनीला अधिक निव्वळ नफा तिमाहीत झाला. महसूलात मात्र इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३.१% घसरण झाली. कंपनीच्या ईबीटीडीए (करपूर्व नफा EBITDA) विश्लेषकांचा अपेक्षेपेक्षा घसरला आहे. करपूर्व नफा मागील तिमाहीतील १५६०१ कोटींच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत १५६०१ कोटी मिळाला आहे जो १% टक्क्याने घसरला आहे.


कंपनीच्या बँक ऑपरेटिंग मार्जिनमध्ये तिमाही बेसिस (Quarter on Quarter QoQ) मागील तिमाहीतील २४.२% वरून या तिमाहीत २४.५% राहिले आहे. ज्यामध्ये ३० बीपीएस बेसिसने वाढ झाली जी अपेक्षेपेक्षा अधिक होती. कंपनीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कंपनीने ११ रूपये प्रति समभाग लाभांश (Dividend) जाहीर केला आहे ज्याची मुदत तारीख (Record Date) १६ जुलै २०२५ ला असणार आहे. कंपनीच्या एकूण कंत्राट मूल्यांकनात (Contact number Value) मध्येही तिमाही बेसिसवर ९.४ बिलियन डॉलर्सवरून वाढत या तिमाहीत १२.२ बिलियन डॉलर्स मिळाले आहेत. कंपनीच्या आयटी अँट्रिब्यूशन दरात (Attribution Rate) मध्ये मागील तिमाहीतील १३.३% तुलनेत वाढत १३.८% वर आला आहे.


कंपनीने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे,' १० जुलै रोजी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या नियामक फाइलिंगमध्ये टीसीएसने म्हटले आहे की, ३० जून २०२५ रोजी टीसीएसचे कर्मचारी संख्या ६१३०६९ होती. आमच्या सहयोगींनी उदयोन्मुख तंत्रज्ञानात १.५ कोटी तास गुंतवले आणि १.३ कोटी कौशल्ये मिळवली, ज्यामुळे ते आमच्या ग्राहकांसाठी परिवर्तनाच्या प्रवासाचे नेतृत्व करू शकले. गेल्या बारा महिन्यांत आयटी सेवांमधील कर्मचारी घट १३.८% होती.'


विशेषतः कंपनीच्या कर्मचाऱ्यांना टिकवण्यात टीसीएसने यश मिळवले होते. यावर प्रसिद्धीपत्रकात टीसीएसचे प्रमुख मानव संसाधन अधिकारी (Chief HR Officer) मिलिंद लक्कड म्हणाले आहेत की, 'नवीनतम कर्मचारी संख्या आणि कर्म चारी कमी होण्याच्या दरांवर भाष्य करताना, टीसीएसचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड म्हणाले, 'या तिमाहीत, आमच्या सहयोगींनी उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी १५ दशलक्ष तास गुंतवले, ज्या मुळे ते आमच्या ग्राहकांसाठी परिवर्तन प्रवासाचे नेतृत्व करू शकले. टीसीएसमध्ये आता उच्च दर्जाचे एआय कौशल्य असलेले ११४,००० लोक आहेत हे लक्षात घेणे समाधानकारक आहे.'


कारण कंपनीच्या अँट्रिब्यूशन दरात लक्षणीय वाढ झालेली आहे मात्र गेल्या बारा महिन्यांच्या (LTM) आधारावर कंपनीची कर्मचारी कपात १३.८ टक्के होती, जी मागील तिमाहीत १३.३ टक्क्यांवरून वाढलेली दिसते. कंपनी कर्मचारी प्रशिक्षण आणि क्षमता विकासात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतानाही हे घडले आहे. दुसरीकडे प्रसिद्धीपत्रकात म्हटल्यानुसार, 'कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत एलटीम (Last Twelve Months LTM) एट्रिशन रेट १३.८ टक्के नोंदवला, जो मार्च २०२५ च्या तिमाहीत १३.३ टक्के होता, तर कर्मचाऱ्यांच्या बाहेर पडण्याच्या प्रमाणात किंचित वाढ दर्शवितो. या वाढीनंतरही, कंपनीने तिमाहीत ५००० हून अधिक कर्मचाऱ्यांची भर घालून आपले कर्मचारी वर्ग वाढवले. ३० जून २०२५ पर्यंत, TCS ची एकूण कर्मचारी संख्या ६१३०६९ होती, जी मागील तिमाहीत ६,०७,९७९ होती' अशा शब्दांत कंपनीने आपली भावना व्यक्त केली.

Comments
Add Comment

Jansurksha Bill : जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई: बहुचर्चित 'राज्य जनसुरक्षा विधेयक' अखेर आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं आहे. शहरी नक्षलवाद

शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना आणणार

राज्यात शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट कृषी विकासासाठी सर्व योजनांमधून ६९ हजार ८८९

Jansurksha Bill : महाराष्ट्राला 'जनसुरक्षा कवच'

'शहरी नक्षलवादा'ला लगाम बसणार, १३ हजार सूचनांनी विधेयक तयार! जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर, तेरा हजार सूचनांनी

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी

'कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या'

मुंबई : भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असेलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत

ऐतिहासिक सिंदूर पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत