कल्याणमध्ये पसरली डेंग्यू-मलेरियाची साथ

त्वरित उपाययोजना करण्याची मागणी


कल्याण (प्रतिनिधी) : कल्याणमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे. याबाबत मनसेचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल मांची भेट घेतली. शहरात डेंग्यूचे किती रुग्ण आहेत पाचा आकडा केडीएमसीकडे नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. केडीएमसीच्या रुग्णालयांची दयनीय अवस्था आहे. केडीएमसी आयुक्तांनी बाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, आरोग्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी, तर रस्त्यावरील खड्यांसंदर्भातदेखील प्रशासनाने गंभीर लक्ष दिले पाहिजे आदी मागण्या यावेळी आयुक्तांकडे करण्यात आल्या, तर लवकरात लवकर आरोग्य आणि इतर समस्या न सुटल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा प्रकाश भोईर यांनी दिला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, कैलास पनवेलकर, सचिन पोपलाइतकर, रोहन पोवार, कपिल पवार, गणेश लांडगे, रोहन आक्केवार, संदीप पंडित आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


काही दिवसांपासून डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कल्याण पूर्व-पश्चिम मध्ये अनेक गगनचुंबी बांधकामे सुरू आहेत. तेथे बांधकामासाठी ने पाणी साचवले जाते. त्यात डेंग्यूच्या मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असतो. अनेक हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे तसेच मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही नालेसफाई तसेच गटार सफाई झाली नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.


या अशा अनेक कारणांमुळे डेंग्यूचा संसर्ग तसेच मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ नाकारता येत नाही. डेंग्यू संसर्गामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात त्वरित फॉगिंग व कीटकनाशक फवारणी करावी, साचलेल्या पाण्याचे निर्जुतीकरण व नाल्याची साफसफाई तसेच कचऱ्याची विल्हेवाट दररोज करावी. घरोघरी जाऊन डेंग्यू प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. आरोग्य तपासणी शिबिरे व रक्त तपासणी मोफत उपलब्ध करून द्यावी. आवश्यक असल्यास तात्पुरत्या वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्या यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आल्या.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना